अहमदनगर । नगर सहयाद्री-
शहरातील सर्जेपुरा परिसरातील इंगळे आर्केडच्या तळघरामध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. याप्रकरणी चालकांसह ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून १४ हजार ८५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कृष्णा अशोक इंगळे ( वय ३१ वर्षे, रा. सबलोक हॉटेलसमोर, सर्जेपुरा अहमदनगर), प्रशांत गजानन सोनवणे ( वय ३४ वर्षे, रा. दुध सागर कॉलनी, केडगांव, अहमदनगर) परेश सुर्यकांत डहाळे ( वय – ३४ वर्षे, रा. हातमपुरा, अहमदनगर) यांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी शहरातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप पवार, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, संभाजी कोतकर यांचे पथक नेमून कारवाईचा सुचना दिल्या होत्या.
अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकाला सर्जेपुरा परिसरातील इंगळे आर्केडच्या तळघरामध्ये हुक्का पार्लर सुरु असलेल्याची माहिती मिळाली. पथकाने सदर ठिकाणी छापा टाकुला असता हुक्का पार्लर चालविणारे व हुक्का पिणारे इसम आढळून आले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.