सुप्यात साडेतीन कोटींची विकास कामे प्रगतीपथावर
सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील सुपा गावच्या सरपंचपदाची संधी मिळाल्यानंतर सरपंच मनिषा रोकडे तसेच त्यांचे पती उद्योजक योगेश रोकडे यांनी अडीत वर्षांच्या कालखंडात कोटयावधी रूपयांची विकास कामे मार्गी लावून विकास कामांची मोहोर उमटविली आहे. सध्या साडेतीन कोटी रूपयांची विकास कामे प्रगतीपथावर असून भविष्यातही उपसरपंच व सदस्यांच्या सहकार्यातून विकास कामांची घोडदौड सुरूच राहिलअसे सरपंच मनिषा रोकडे व उद्योजक योगेश रोकडे यांनी सांगितले.
ग्रामपंचायत स्तरावर दशक्रिया विधी घाट सीडीवर्क २० लाख, येणारे वस्ती येथे गुलाब येणारे घर ते बाळासाहेब येणारे ते मधु येणारे ते अनिल येणारे घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण १३ लाख, बाजारतळ शौचालय १३ लाख, खडकवाडी येथे चिकणे घर ते बबन पवार घर रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, गावांतर्गत शेळके घर ते काळूबाई हॉटेल रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, गावांतर्गत प्रवीण गवळी घर ते शेळके घर रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, मळगंगा देवी मंदिर ते नवीन वसाहत रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, गणपती मंदिर रस्ता काँक्रीटीकरण ६ लाख, गावांतर्गत काळूबाई हॉटेल ते बनकर भाऊसाहेब घर बंदीस्त गटार योजना ५ लाख, गावांतर्गत बनकर भाउसाहेब घर ते शेळके घर येथे बंदीस्त गटार योजना ५ लाख, ग्रामपंचायत कार्यालय शौचालय दुरूस्ती ५ लाख, पवार वाडी येथे जि प शाळा ते पवार घर ते ओढा बंदीस्त गटार योजना ३ लाख २५ हजार, आदर्श नगर येथे डॉ महांडुळे घर ते वाळुंज घर बंदीस्त गटार योजना २ लाख२३ हजार, डोंगरे वस्ती येथे हरिभाऊ पवार घर ते जि प शाळा बंदीस्त गटार योजना २ लाख २० हजार, डोेंगरे वस्ती येथे बाबुराव कुंडलीक घर ते वाळूंज घर बंदिस्त गटार योजना २ लाख २० हजार, पवार वाडी येथे संपत पवार घर ते आनंदा पवार गोठा बंदीस्त गटार योजना १ लाख २५ हजार.
खा. डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून आदर्शनगर येथे बुचूडे सर घर ते साई स्पेस रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, नवीन वसाहत येथे टकले घर ते संपत पवार घर रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, नवीन वसाहत येथे आदम मेजर घर रस्ता काँक्रीटीकरण १० लाख. १५ व्या वित्त आयोगातून मळगंगा देवी मंदीर ते नवीन वसाहत रस्ता काँक्रीटीकरण ९ लाख, बाजारतळ ते हायस्कुल रस्ता बंदीस्त गटार योजना ३ लाख २५ हजार, नवीन वसाहत जवक गिरणी बंदीस्त गटार योजना ३ लाख २५ हजार, येणारे वस्ती येथे बंदीस्त गटार योजना २ लाख १४ व्या वित्त आयोगातून पारनेर रोड ते हायस्कुल रस्ता काँक्रीटीकरण १५ लाख, जि प शाळा गावठाण, खडकवाडी येथे ब्लॉक बसविणे ८ लाख. दलित वस्ती विकास अंतर्गत दलीत वस्ती येथे फिल्टर प्लॅन्ट बसविणे ८ लाख ५० हजार, हाडोळा वस्ती येथे अंतर्गत डीपी बसविणे ६ लाख, हाडोळा वस्ती येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे ६ लाख, हरिजन वस्ती येथे सार्वजनिक शौचालय बांधणे ३ लाख. आदी विविध विकास कामे प्रगतीपथावर आहेत.
सुसज्ज दशक्रियाविधी घाट
सुपा येथे दशक्रिया विधीसाठी येणा-या नागरीकांना बसण्यासाठी जागा नसल्याने त्यांची कुचंबना होत होती. ग्रामपंचायत स्तरावर दशक्रिया घाटासाठी २० लाख रूपयांची तरतुद करण्यात आली असून लवकरच हे काम सुरू होईल.
कचर्यावर होणार प्रक्रिया
कचरा संकलनावर होणारा खर्च भागविण्यासाठी कचर्यात संकलीत होणारे प्लॅस्टीक, पुठ्ठा आदींवर प्रक्रिया करून त्यातून उत्पन्न घेण्यात येणार आहे. या उत्पन्नातून कचरा संकलन तसेच कर्मचारी यांचे पगाराचा खर्च भागविता येणार आहे. त्यासाठी औद्योगिक वसाहतीमध्ये एक एकर व्यवसायीक प्लॉट घेण्यात येणार आहे.