spot_img
अहमदनगरभाजपाकडून स्वतंत्र चाचपणी! 'आक्रमक' चेहराच नगर शहरात 'निर्णायक' ठरणार? विधानसभेसाठी 'यांचे' नाव...

भाजपाकडून स्वतंत्र चाचपणी! ‘आक्रमक’ चेहराच नगर शहरात ‘निर्णायक’ ठरणार? विधानसभेसाठी ‘यांचे’ नाव अग्रस्थानी

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांची गठ्ठा मते भाजपाच्या विरोधात गेल्यानंतर हिंदुत्वाची व्होट बँक शाबूत ठेवण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर निर्माण झाले आहे. हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा आक्रमक चेहराच आता भाजपाला नगर शहरात निर्णायक ठरणार आहे. शांत, संयमी आणि तितकाच आक्रमक, प्रसंगी रस्त्यावर उतरणारा, प्रशासनाला जाब विचारणारा आणि अन्यायाच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेणार चेहराच भाजपाला नगर शहरात आता संजीवनी देणार आहे.

महायुतीत नगरची जागा अजित पवार गटाकडे असली तरी स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाला तर भाजपाकडून असा चेहरा म्हणून ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांचे नाव सध्या अग्रस्थानी आले आहे. हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्‍या विविध संघटनांशी लोढा यांचे असणारे संबंध, भाजपातील जुन्या- नव्यांचा मेळ घालण्याचे कौशल्य, संघटनेतील कामाचा अनुभव या त्यांच्या जमेच्या बाजू ठरणार आहेत.

हिंदुत्वाच्या विचाराचा पुरस्कार करणारा लोकप्रतिनिधी नगर शहराने कायमच विधानसभेवर पाठवला. त्यातूनच अनिलभैय्या राठोड यांना नगरकरांनी सलग संधी दिली. मोबाईल आमदार ही त्यांची ओळख राहिली. जनतेच्या सुखदु:खात चोवीस तास सहभागीहोणारा आणि त्यांच्या वेदना समजून घेताना प्रसंगी पोलिस- महसूल- पालिका प्रशासनाला खुलेआम आडवा जाणारा आमदार ही त्यांची ओळख राहिली.

त्यामुळेच त्यांनी नगरकरांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. हाकेला धावून जाताना कोणाचाही मुलाहीजा न ठेवता न्याय भूमिका राठोड यांनी शेवटपर्यंत घेतली. त्यामुळेच नगरकरांना रात्री- अपरात्री राठोड यांना संपर्क करण्यात कधीच कोणत्या मध्यस्थाची गरज लागली नाही. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर समोर आलेल्या मतांच्या आकडेवारीनुसार भाजपासमोर मोठी आव्हाने नगर शहरात तरी उभी ठाकली आहेत.

राज्यात महायुतीची सत्ता असून भाजपासमोर अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत नगर शहरातील भाजपाचे थोडेफार सुत जुळत असले तरी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीसोबत तसे होताना दिसत नाही. पवार गटाचे नगर शहरातील आमदार संग्राम जगताप व त्यांच्या समर्थकांसोबत भाजपाचा गट अंतर ठेवून असल्याने कधीच लपून राहिलेले नाही. त्यामुळेच नगर शहर विधानसभेची जागा भाजपाने स्वतंत्र लढावी अशी मागणी सातत्याने केली जाते.

थेटपणे भिडणारा, बोलणारा आणि जाब विचारणारा चेहरा
नगर शहरात मतांची बदलती राजकीय, जातीय आणि सामाजिक गणिते यांचा विचार करता नगर शहरातून भाजपाला स्वतंत्र लढण्याची वेळ आल्यास आक्रमक चेहरा द्यावा लागणार आहे. थेटपणे भिडणारा, बोलणारा आणि जाब विचारणारा चेहरा द्यावा लागणार आहे. याशिवाय प्रशासकीय कामाची हातोटी, संघटन कौशल्य आणि आश्वासक चेहरा द्यायची वेळ आल्यास सध्यातरी भाजपासमोर वसंत लोढा यांचेच नाव अग्रभागी असल्याचे दिसून येत आहे. नगर शहरातील संघ परिवार आणि भाजपाच्या निष्ठावान गटाकडून वसंत लोढा यांच्या नावास सध्यातरी पसंती दिली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...