spot_img
अहमदनगरगोळीबार प्रकरणातील आरोपी पळाला; जिल्हा रुग्णालयात नेमकं काय घडलं?

गोळीबार प्रकरणातील आरोपी पळाला; जिल्हा रुग्णालयात नेमकं काय घडलं?

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
अहिल्यानगर शहरातील जिल्हा रुग्णालयातून गोळीबार प्रकरणातील एक आरोपी पळून गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सुनील उत्तम लोखंडे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांचे पथक आरोपीच्या मागावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून आरोपी लोखंडे सबजेलमधून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता.

लघवीचा त्रास होत असल्याची तक्रार असल्यामुळे या आरोपीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवारी सकाळी जिल्हा रुग्णालया मधून हा आरोपी फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाले असून दुपारी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. सुनील उत्तम लोखंडे असे फरार झालेले आरोपीचे नाव असून तो पुण्यात असताना बडतर्फ झाला होता.

राहुरी येथे त्याने बंदुकीच्या जोरावर एका प्रतिष्ठित महिलेचे अपहरण प्रकरणात मारहाण करण्याऱ्या निलंबित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला होता. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल का केला? असे म्हणत या पोलीस अधिकाऱ्यानं महिलेच्या घरी गोळीबार करून धुडगूस घातला होता. त्या महिलेच्या मुलांना डांबून ठेवले होते.

त्यांना वाचविण्यास गेलेले श्रीरामपूरचे तात्कालीन पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यावर आरोपीने रिव्हलवर रोखले होते. त्यावेळी मिटके यांनी प्रसंगावधान राखल्याने गोळी चुकली आणि उपअधीक्षक मिटके हे थोडक्यात बचावले होते. तेव्हापासून आरोपी हा नगर मधील सबजेलमध्ये होता. त्याला नुकतेच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश प्राप्त; सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना, असा आहे कार्यक्रम

सुनील चोभे | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने...

‌‘सेनापती बापट‌’ मध्ये गैरव्यवहार! चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

पारनेर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील 75 वषय शेतकरी आणि विमा...

नगर, श्रीगोंदा, शेवगाव,पाथर्डीत तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

पिकांचे नुकसान | शेड, घराची पत्रे उडाली | जेऊर, चिचोंडी पाटील, खडकीत नुकसान अहिल्यानगर...

‌‘रयत‌’चे विध्यार्थी गिरवणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे: चेअरमन चंद्रकांत दळवी

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत शिक्षण देणारी राज्यातील पहिली शिक्षण संस्था ‌‘रयत‌’ ठरणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री आर्टिफिशियल...