spot_img
महाराष्ट्र‌‘सेनापती बापट‌’ मध्ये गैरव्यवहार! चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

‌‘सेनापती बापट‌’ मध्ये गैरव्यवहार! चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील 75 वषय शेतकरी आणि विमा एजंट सुभाष अश्रुजी आग्रे यांनी सेनापती बापट मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटीच्या चेरमनसह संचालक मंडळातील सदस्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप करत पारनेर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. आग्रे यांनी त्यांच्या पत्नी शशिकला यांच्या नावे संस्थेत बचत खाते आणि मुदत ठेवींमध्ये सुमारे 3 लाख 50 हजार रुपये गुंतवले होते. याशिवाय, त्यांनी इतर 29 ठेवीदारांच्या 2 कोटी 50 लाख 38 हजार 613 रुपयांच्या रकमेचा अपहार झाल्याचा आरोप केला आहे.

2021 मध्ये त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने अळकुटी शाखेत बचत खाते उघडले होते. त्याचवेळी, त्यांनी दीड लाख रुपये मुदत ठेवी पावत्यांमध्ये गुंतवले होते. संस्थेच्या मॅनेजर किरण शिंदे, चेअरमन रामदास भोसले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रामदास झंझाड यांनी त्यांना जास्त व्याज दर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर, 2022 मध्ये मुदत ठेवींची मुदत पूर्ण झाल्यावर त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने त्याच ठेवींचे नूतनीकरण केले. मात्र, डिसेंबर 2023 मध्ये अचानक पैशांची आवश्यकता भासल्याने आग्रे यांनी शाखेत पैसे काढण्याची मागणी केली. पण मॅनेजरने त्यांना पैसे उपलब्ध नाहीत असे सांगितले आणि प्रतीक्षा करण्यास सांगितले. यामुळे आग्रे यांना संशय आला. आग्रे यांनी संस्थेच्या मुख्य कार्यालयात संपर्क साधला, परंतु कोणाकडूनही ठोस माहिती मिळाली नाही.

2024 मध्ये संस्थेने गणेश मंगल कार्यालयातील सभेत 25% रक्कम लवकरच परत करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते आश्वासन पूर्ण झाले नाही. त्यानंतर, मासिक 5% रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते, पण फक्त दोन महिनेच 2% रक्कम मिळाली. आग्रे यांनी 21 एप्रिल 2025 रोजी वकिलांमार्फत नोटीस पाठवून संस्थेने पैसे परत करण्याची मागणी केली होती, परंतु संस्थेने या आरोपांना फेटाळले. यामुळे, त्यांनी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून, चेरमनसह संचालक मंडळातील सदस्यांनी संगनमताने ठेवीदारांचे पैसे लुबाडून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. तसेच, अन्य 29 ठेवीदारांच्या देखील कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा आहे. आग्रे यांच्यासह इतर ठेवीदारांनी संस्थेच्या व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. पारनेर पोलीस स्टेशनने संबंधित फिर्याद नोंदवली असून, तपास सुरू आहे. संस्थेच्या व्यवस्थापनावर फसवणुकीचा गंभीर आरोप असल्यामुळे या प्रकरणी कायदेशीर कार्यवाही कशी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यांच्यावर झाले गुन्हे दाखल
चेअरमन रामदास हनुमंत भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी रामदास अनंतराव झंझाड, आण्णासाहेब भाऊसाहेब औटी, ॲड. पंडितराव सखाराम कोल्हे, संभाजीराव सोमवंशी, विलास दशरथ बालवडकर, बाळासाहेब शामराव धोत्रे, बाबाजी किसन तनपुरे, रमेश बापू वाजे, संतोष गंगाधर चाहेर, अरुणा बाळासाहेब लाळगे, भास्कर विठोबा जाधव, दत्तात्रय कोंडीभाऊ कुलट , किरण शिंदे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...