spot_img
अहमदनगरसातपुते कुटुंबीयांवर हल्ला करणाऱ्या लँड माफिया गुंडांवर कडक कारवाई करा

सातपुते कुटुंबीयांवर हल्ला करणाऱ्या लँड माफिया गुंडांवर कडक कारवाई करा

spot_img

शहर भाजपाची पोलीस अधिक्षकांकडे मागणी

अहमदनगर / नगर सह्याद्री –
सोमवारी सायंकाळी केडगाव येथे भाजपाचे मंडल अध्यक्ष निलेश सातपुते त्यांच्या पत्नी अर्चना सातपुते व परिवारातील सदस्यांवर गुंड प्रवृत्तीच्या हल्लेखोरांनी अमानुषपणे हल्लाकरून सर्वांना गंभीर जखमी केले आहे. ही घटना अंत्यंत गंभीर असून हल्लेखोरांनी सातपुते कुटुंबीय संपवण्यासाठीच हा हल्ला केला आहे. शहरात नागरिकांच्या जमिनींवर हे लँड माफिया सरार्सपणे ताबे मारत आहेत. सोमवारी केडगाव मध्ये घडलेली घटनाही जमिनीवर ताबा मारण्यासाठीच घडली आहे. एकूणच नगर शहरात गेल्या काही वर्षांत असे ताबामारीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्यातून मारहाणी, हत्या देखील झाल्या आहेत. शहरात गुडांनी मोठ्‌या प्रमाणात थैमान घातले असून कालची ही घटना त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने शहरातील गुंड प्रवृत्तीचा बंदोबस्त करावा. केडगाव मधील दहशत कमी होण्यासाठी या घटनेतील आरोपींना तातडीने पकडून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी. जेणेकरून सर्वसामान्य नागरिक सुरक्षितपणे जगता येईल, अशी मागणी शहर भाजपच्या शिष्ठमंडळाने जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या कडे निवेदनाद्वारे केली.

शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज सकळी पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले. यावेळी ज्योती सातपुते यांनी प्रत्यक्ष घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती पोलीस अधिक्षकांना दिली. त्या म्हणाल्या, सातपुते कुटुंबीयांवर काही गुंड हल्ला करणार असल्याची माहिती घटना घडण्या आधी मी केडगाव पोलीस स्टेशनला दिली होती. मात्र तेथील महिला कर्मचाऱ्यांनी मी केलेला फोन गांभीर्याने न घेतल्याने आमच्यावर हा हल्ला झाला आहे. अँब्युलन्स मधून आलेल्या मारेकऱ्यांनी अत्यंत क्रूरपणे घरातील पुरुषांना व महिलांना मारहाण केली आहे. त्यांच्याकडे खूप हत्यारे होती. सर्व कुटुंब यामध्ये गंभीर जखमी झाले आहे. घरात मारहाण चालू असतानाही मी पोलिसांना फोन केला होता. पण त्यांनी दखल घेतली नाही.

यावेळी अभय आगरकर यांनी आरोपींवर गंभीर स्वरूपाचे कलमे लावून कडक कारवाई करण्याची मागणी केली. पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी या घटनेचा पोलीस प्रशासन बारकाई तपास करत असून आरोपींना लवकरच अटक करून कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिली.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, सार्वजनिक बांधकाम विभागाने केडगाव लिंक रस्त्यातील अतिक्रमण वेळेत काढले असते तर कदाचित ही घटना टळली असती. परंतु सा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सातपुते कुटुंबियांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत अतिक्रमण हटविले नाही परिणामी त्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घडली आहे. ज्या गुंडांकडून सातपुते परिवारावर अमानुष हल्ला करण्यात आला आहे त्यांच्या विरोधात जास्तीत जास्त कडक कारवाई करण्यात यावी. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडून हे रस्त्यातील अतिक्रमण त्वरीत काढण्यात यावे त्यासाठी लागणारा पोलीस बंदोबस्त देण्यात यावा ही विनंती.

यावेळी भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्र गंधे, माजी अध्यक्ष वसंत लोढा, सरचिटणीस सचिन पारखी, प्रशांत मुथा, गोपाल वर्मा, पंडित वाघमारे, शशिकांत पालवे, नितीन शेलार, बाळासाहेब खताडे, विकास घोरपडे, राजु शेलार, ज्ञानेश्वर धिरडे, सुरेश लालबागे, ऋषिकेश आगरकर, अनिल निकम, प्रकाश जोशी, हर्षल बोरा, महेश गुगळे, बाळासाहेब भुजबळ, साहिल शेख, साहेबराव विधाते, अशोक गायकवाड, चंद्रकांत पाटोळे, प्रवीण ढोणे, मयूर बोचूघोळ, ज्योती सातपुते, शुभांगी झरेकर, अविनाश साकला, दत्ता गाडळकर, कावळे, सोमनाथ जाधव, रियाज कुरेशी, सुरेखा खैरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...