spot_img
देशदिल्लीचं वऱ्हाड महाराष्ट्रात येणार? राहुल गांधी अडकणार विवाहबंधनात? खा. प्रणिती शिंदे..; चर्चांना...

दिल्लीचं वऱ्हाड महाराष्ट्रात येणार? राहुल गांधी अडकणार विवाहबंधनात? खा. प्रणिती शिंदे..; चर्चांना उधाण

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत आणि महायुती व महाविकास आघाडीकडून जोरादार रणनीती आखण्यास सुरवात झाली आहे. मात्र राजकीय वर्तुळात चर्चा एका वेगळ्या विषयावर आहे.काँगेसचे नेते राहुल गांधी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

आणि दिल्लीचं वऱ्हाड महाराष्ट्रात येणार आहे? अश्चर्याची बाब म्हणजे, त्यांचा हा विवाह महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आणि काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याशी होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार पसरली आहे.

या चर्चेला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रणिती शिंदे ह्या काँग्रेसच्या युवा नेत्या आहेत आणि त्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात उल्लेखनीय विजय मिळवला आहे. राहुल गांधींच्या विवाहाच्या चर्चेसोबतच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे, ज्यात राहुल गांधी एका महिलेसोबत दिसत आहेत.

अद्याप, या चर्चांवर कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांच्या कुटुंबाकडून या बाबत खुलासा झालेला नाही. प्रणिती शिंदे यांची एक ग्लॅमरस राजकारणी म्हणून राज्यात ओळख आहे आणि त्यांनी वडिलांच्या पराभवाचा बदला घेत, दणदणीत विजय मिळवला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेला ‘ब्रेक’ घेतलेले नितीन दिनकर विधानसभेला विजयाचा ‘गिअर’ टाकणार

काँग्रेसचा बालेकिल्लाला भाजप सुरुंग लावणार श्रीरामपूर | नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही...

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला बाळासाहेब खिलारी गटाने फटाके फोडत केला आनंद साजरा पारनेर/प्रतिनिधी...

आता ‘ही’ माझी शेवटची निवडणूक; माजी मंत्री शिवाजी कर्डिले स्पष्ट्च बोलले..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लवकर शेतकऱ्यांना दुधाच्या जोडधंद्यासाठी...