spot_img
ब्रेकिंगमनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार! 'त्याला' निवडणुकीत धडा शिकवणार, १७ सप्टेंबर पासून..

मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार! ‘त्याला’ निवडणुकीत धडा शिकवणार, १७ सप्टेंबर पासून..

spot_img

जालना | नगर सह्याद्री:-
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. येत्या १७ सप्टेंबरपासून अंतरवाली सराटी आमरण उपोषणाला बसणार, असे जरांगे यांनी सांगितले आहे. जालना येथे माध्यमांसोबत संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली. यापूर्वी मनोज जरांगे यांनी आपण २९ सप्टेंबरला आमरण उपोषण करणार, असा इशारा दिला होता.

मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार, असे जरांगे यांनी माध्यमांसोबत बोलताना स्पष्ट केले आहे. सगेसोयरे अधिसूचना काढून मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे यांनी लावून धरली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून यासाठी ते आंदोलन करीत आहेत.राज्य सरकारने जर मराठा समाजाला आरक्षण दिले नाही.

तर आगामी विधानसभा निवडणुकीत मराठ्यांची ताकद दाखवणार, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांना मराठ्याचे आमदार हाताखाली धरून आंदोलन बंद करायचं आहे, असा आरोपही जरांगे यांनी केला आहे. जो कुणी मराठ्यांच्या विरोधात जाईल त्याला निवडणुकीत धडा शिकवू, असंही जरांगेंनी यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेला ‘ब्रेक’ घेतलेले नितीन दिनकर विधानसभेला विजयाचा ‘गिअर’ टाकणार

काँग्रेसचा बालेकिल्लाला भाजप सुरुंग लावणार श्रीरामपूर | नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही...

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला बाळासाहेब खिलारी गटाने फटाके फोडत केला आनंद साजरा पारनेर/प्रतिनिधी...

आता ‘ही’ माझी शेवटची निवडणूक; माजी मंत्री शिवाजी कर्डिले स्पष्ट्च बोलले..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लवकर शेतकऱ्यांना दुधाच्या जोडधंद्यासाठी...