spot_img
अहमदनगरAhmednagar: टॅगिंग करत स्वतंत्र पथक नेमणार! 'या' काळ्या धंद्याला ब्रेकच लावणार: खासदार...

Ahmednagar: टॅगिंग करत स्वतंत्र पथक नेमणार! ‘या’ काळ्या धंद्याला ब्रेकच लावणार: खासदार विखे पाटील

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
महाराष्ट्रातील दुभत्या जनावरांची संख्या व दूध उत्पादन यात तफावत असून, दूध भेसळीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. दुधातील भेसळ रोखण्यासाठी राज्यभरातील दुभत्या जनावरांना टॅगिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे भेसळीवर नियंत्रण येईल, असे मत खा. डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केले.

पत्रकार दिनानिमित्त खा. डॉ. विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या नवीन निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणात दूधभेसळ होत असल्यामुळे दुधाचे प्रमाण वाढले आहे.

परिणामी दुधाचे दर घसरले आहेत. खरेदी दर वाढविणे शय नसल्याने आता शासनाने दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचे ठरवले आहे. हे अनुदान जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांसाठी देण्याचे जाहीर केले आहे.

सुरुवातीला फक्त सरकारी सहकारी दूध संस्थांना दूध घालणार्‍या दूध उत्पादक शेतकर्‍यांनाच हे अनुदान देण्यात येणार होते. मात्र, त्यातील त्रुटी लक्षात आल्यानंतर सरसकट अनुदान देण्यात येणार आहे.

भेसळखोरांचे रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी टॅगिंग

भेसळ करणारे लोक दुधात युरिया, तूप, दुधाची पावडर आदी रासायनिक पदार्थाचा वापर करतात. भेसळखोरांचे रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी टॅगिंग सिस्टीम वापरली जाणार आहे. टॅगिंग केल्याने साधारण एक जनावर किती दूध देते, याचा अंदाज येईल. त्यामुळे भेसळीवर निर्बंध येतील. राज्यातील भेसळखोरांचे रॅकेट संपवण्यासाठी ही टँगिंग मोहिम पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरू केल्याची माहिती खा. विखे यांनी दिली.

प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र पथक
दुधातील भेसळ रोखणे अतिशय कठीण असल्यामुळे सरकारने नवीन उपाय शोधला आहे. त्यासाठी दुभत्या जनावरांचे टॅगिंग केले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र भेसळविरोधी तपासणी पथक तयार केले आहे. अशी पथके गावोगावी तपासणी करणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...