spot_img
ब्रेकिंगसैफवरील हल्ला संशयास्पद! मंत्री नितेश राणेंची शंका; अजितदादा काय म्हणाले?

सैफवरील हल्ला संशयास्पद! मंत्री नितेश राणेंची शंका; अजितदादा काय म्हणाले?

spot_img

पुणे नगर सहयाद्री:-
अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ल्या झाल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. सैफला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर सर्जरी केल्यानंतर त्याला डॅाक्टरांनी ५ दिवसांनंतर रुग्णालयातून डिसार्च दिला. त्यानंतर संजय निरुपम यांनी एवढ्या लवकर डिसार्च कसा दिला असा प्रश्न उपस्थित केला होता.

यानंतर आता सैफवरील हल्ला संशयास्पद आहे. त्याने स्वतःच चाकू मारून घेतला की काय, अशी शंका असल्याचे मंत्री नितेश राणे म्हणाले होते. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून हल्लेखोर सापल्याने शंकला वाव नसल्याचे पवार म्हणाले.

मंत्री नितेश राणे यांनी अभिनेता सैफ अल्ली खानवर खरंच हल्ला झाला की तो अभिनय करतोय असा संशय व्यक्त केला होता. यावर पत्रकारांनी अजित पवार यांना प्रतिक्रया विचारली असता त्यांनी याबद्दल कुठलीही संशयास्पद माहिती पुढे आली नसल्याचे म्हटले आहे.

मी राणेंशी बोलेन, पण हल्लेखोर सापडल्यामुळे शंकेना वाव नसल्याचे अजित पवार नितेश राणेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे. कालच नितेश राणे बंदर आणि इतर विभागांच्या आढाव्यासाठी आले होते. पण, मला त्यांनी सैफ अली खानविषयी केलेल्या वक्तव्यावर काही माहिती नाही. मी त्यांना विचारेन, असे अजित पवार म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...