spot_img
अहमदनगरश्रीरामपुरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे; तीन महिन्यात तीन गोळीबार!

श्रीरामपुरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे; तीन महिन्यात तीन गोळीबार!

spot_img

श्रीरामपुर । नगर सहयाद्री:-
निवृत्ती नंतर सुखी, सुरक्षित राहण्यासाठी नावलौकिक असलेल्या श्रीरामपूर शहरात काय चालले आहे, असा प्रश्न सुजान नागरिकांना पडतो आहे. काही दिवसांपूर्वीच माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा वाहनाचा पाठलाग करून त्यांच्या वाहनाच्या दिशेने गोळीबार करण्यात आला होता. यासंदर्भात आमदार हेमंत ओगले यांनी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवून प्रशासनाने आरोपींना अटक करावी अशी मागणी केली होती.

परंतु प्रशासनाला आरोपी पकडण्यात अध्याप यश आले नाही. त्यानंतर देखील श्रीरामपूर शहरात तीन महिन्यात तीन ठिकाणी गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे शहरात कायदा सुव्यवस्था राहिली आहे का? गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली नाही का? असा प्रश्न निर्माण होतो आहे.

श्रीरामपूर शहरामध्ये विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या काही तासांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा वाहनाचा पाठलाग करून त्यांच्या वाहनाच्या दिशेने गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर जुन्या भांडणातून शहरातील वार्ड. नं२ परिसरातील घासगल्ली येथे एकाने पिस्तूल काढून गोळीबार केल्याची घटना घडली होती.

त्यानंतर शहरातील कॉलेज रोड परिसरात एका तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी देखील गोळीबार करण्यात आल्याचेही बोलले जात होते.या सर्व घटना पाहता श्रीरामपूर शहरामध्ये कायद्याचे राज्य राहिलेले नाही, असे दिसून येते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. संध्याकाळनंतर महिला घराच्या बाहेर पडू शकत नाही. किंवा पडल्या तरी त्या सुरक्षित राहतील, अशी खात्री राहिलेली नाही.

त्यामुळे श्रीरामपूरमध्ये कायदा व सुव्यवस्था मोडित निघाल्याचे दिसून येत आहे. यावर उपाय म्हणून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला व श्रीरामपूर विभागाला खमके पोलीस अधिकारी नियुक्त करावेत तसेच गुन्हेगारी वृत्तींना जो कोणी संरक्षण देत असेल त्यांचाही बंदोबस्त करण्यात यावा, अशी अपेक्षा शहरातील सामान्य नागरिकांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडकी बहीण योजनेतून पाच लाख महिला अपात्र; कारण आलं समोर..

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. लाडकी...

स्व. वसंतराव झावरे यांची स्वप्ने पूर्ण करणार; कोण काय म्हणाले पहा…

आ. काशीनाथ दाते | वासुंदे येथे स्व. आ. वसंतराव झावरे पाटील यांच्या पुण्यस्मरणनिमित्त कार्यक्रम पारनेर...

‘त्यांना’ दिल्लीच्या जनतेने जागा दाखविली; मंत्री विखे पाटील

लोणी | नगर सह्याद्री भारतीय जनता पक्षाने दिल्लीच्या विधानसभेत मिळविलेला एैतिहासिक विजय विचारांचा आणि विकासाचा...

…म्हणुन दोन गटांत राडा; ‘असा’ घडला नको तोच प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शेतजमिनीच्या वादातून दोन गटांत मारहाण झाल्याची घटना शिंगवे नाईक शिवारात बुधवारी...