नगर सह्याद्री टीम
अनेकांना वाढलेलं पोट, कंबरेच्या चरबी आदींमुळे अनेक समस्या निर्माण होतात. बहुतेक लोक वेटलॉस होण्यासाठी अनेक प्रयत्न देखील करत असतात.
परंतु तुमची जीवनशाली व आहारात बदल केला तर नक्कीच फायदा होतो. मॉर्निंग रूटीनचा तुमच्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो आणि चरबी कमी होण्यास मदत होते. चला जाणून घेऊयात या उपायांबद्दल…
कोमट लिंबू पाणी : एका रिपोर्टनुसार, सकाळी एक ग्लास कोमट पाणी व लिंबू जर घेतले तर त्याने मेटाबॉलिज्म वेगवान होतात. हे हायड्रेशन आणि व्हिटॅमिन सी प्रदान करते. फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून तुमचे रक्षण करते.
हळद आणि काळी मिरीचे पाणी : हळदीपासून कर्क्यूमिन मिळते. यामुळे शरीराची जाडी, सुजन कमी करण्यास मदत होते. त्याचबरोबर काळी मिरी मेटाबॉलिज्म वाढवून फॅट बर्न करण्याचे काम करते. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने वजन लवकर कमी होते.
दालचिनीचा चहा : हे रक्तातील साखर नियंत्रित करते आणि इन्सुलिन रेजिस्टेंस कमी करते. हे प्यायल्याने पचनशक्ती वाढते आणि पोटाच्या समस्या दूर होतात. जे पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते.