श्रीगोंदा / नगर सह्याद्री –
श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव गलांडे येथील समाजकार्यकर्ता सुरेश हरिभाऊ गलांडे यांची प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
सामाजिक, दिव्यांग, सांस्कृतिक, पर्यावरण तसेच निराधारांना मदतीचा हात देण्याबरोबरच कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची ही निवड करण्यात आली.
ही निवड प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अॅड. लक्ष्मण पोकळे, जिल्हाध्यक्षा लक्ष्मीताई देशमुख, सचिव हामिद भाई, मधुकर घाडगे, उत्तर जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब ढोकणे तसेच समन्वयक व श्रीगोंदा तालुक्याचे तत्कालीन अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व सदस्यांच्या उपस्थितीत बिनविरोध जाहीर करण्यात आली.
सुरेश गलांडे यांच्या निवडीनंतर विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे. समाजकार्यातील त्यांचे योगदान आणि अपंग व निराधारांसाठी केलेले प्रयत्न आगामी काळात प्रेरणादायी ठरतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.