spot_img
देशअजित पवार गटाला सुप्रीम सूचना! कोर्ट म्हणाले, घड्याळऐवजी आता..

अजित पवार गटाला सुप्रीम सूचना! कोर्ट म्हणाले, घड्याळऐवजी आता..

spot_img

नवी दिल्ली | वृत्तसंस्था
मागील महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांना अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह दिलं होतं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती सूर्या कांत आणि के.व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीत कोर्टाने अजित पवार गटाला घड्याळ चिन्हाऐवजी दुसरं चिन्ह घेण्याचा पर्याय सुचवला आहे.

कोर्टात सुनावणीवेळी सिंघवी यांनी निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिलेल्या घड्याळ चिन्हावर आक्षेप घेतला आणि पक्षात फूट पडल्यानंतर त्यांना नवीन चिन्ह द्यायला हवे होते. परंतु आम्हाला नवीन चिन्ह दिले असं त्यांनी कोर्टाला सांगितले. अजित पवार गटाने घड्याळाव्यतिरिक्त कोणतेही चिन्ह वापरावे. घड्याळ चिन्ह आणि शरद पवार अशी ओळख अतूटपणे जोडलेली आहे असं सिंघवींना कोर्टात युक्तिवाद केला. सिंघवी यांच्या युक्तिवादानंतर खंडपीठानेही याची दखल घेत अजित पवार गटाला वेगळे चिन्ह वापरण्याची सूचना केली.

कोर्टाने म्हटलं की, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले असल्याने उद्या समजा कोर्टाने हा आदेश स्थगित केला आणि निवडणूक मध्यावर असतील तर काय होईल असा सवाल न्या. कांत यांनी विचारला. त्यामुळे आम्ही तुम्हाला एक सूचना करतो, तुम्ही घड्याळ चिन्हाऐवजी दुसरे चिन्ह घ्या जेणेकरून शांततेने आणि तणावाशिवाय पुढे जाऊ शकता. तुम्ही तुमच्या चिन्हासोबत निवडणूकही लढवू शकता. आम्ही फक्त तुम्हाला हा पर्याय सूचवत आहोत. तुम्हाला तुमच्या आवडीचे चिन्ह घ्या, असं काही करता येतंय असा आम्ही पर्याय सूचवतो असं न्यायधीशांनी म्हटले आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सुचवलेल्या पर्यायावर अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काय निर्णय घेतो हे पाहणे आता औत्सुयाचे ठरणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संदीपदादा कोतकर विचार मंच महापालिकेसाठी ऍक्टिव्ह! ‘ते’ अभियान राबवत निवडणुकीची तयारी..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२५ मध्ये होतील असे...

देवेंद्रजी, लाडक्या बहिणी अन्‌‍ त्यांच्या लेकीबाळी राज्यात असुरक्षित झाल्यात!

सारिपाट | शिवाजी शिर्के:- लोकसभा अन्‌‍ त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकांचा धुराळा खाली बसत असताना आणि...

कृतनिश्चयी प्रधानसेवक!

Former Prime Minister Manmohan Singh : साधारण 2012 पासून, त्या वेळी पंतप्रधान पदावर असलेले...

बीडच्या घटनेची पुनरावृत्ती! सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रकार

Maharashtra Crime News: मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे बीड जिल्ह्यातलं राजकारण तापलं...