spot_img
अहमदनगरनीलेश पारनेर पुरताच...! आमदार लंके यांच्या प्रवेशाबाबत अजित पवार यांचे 'मोठे' वक्तव्य,...

नीलेश पारनेर पुरताच…! आमदार लंके यांच्या प्रवेशाबाबत अजित पवार यांचे ‘मोठे’ वक्तव्य, पहा

spot_img

बारामती । नगर सहयाद्री-
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, पारनेरचे आमदार निलेश लंके हे आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. यावर बारामतीत माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

राजकारणात कुणालाही कुठेही जाता येतं. वास्तविक नीलेश लंकेला पक्षात मी आणलं. त्याला मनापासून आधार मी दिला. आताही विकासकामांसाठी नीलेशला मोठ्या प्रमाणावर मदत मी केलेली आहे, नीलेश पारनेरपुरता लोकप्रिय आहे. पण बाकीच्या मतदारसंघात त्याला वाटतं तितकं सोपं नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढे म्हणाले, कालच नीलेश माझ्याकडे आला होता. मी नीलेश सोबत चर्चा केली. त्याला काही गोष्टी समजून सांगितल्या. पण काही लोकांनी त्याच्या मनात हवा घातली आहे की, तू खासदार होशील म्हणून पण वास्तव तसं नाहीये. नीलेश पारनेरपुरता लोकप्रिय आहे.

पण बाकीच्या मतदारसंघात त्याला वाटतं तितकं सोपं नाही. मी त्याला सांगितलं होतं, तू तशा पद्धतीने वागू नको. जितकं समजून सांगणं गरजेचं आहे. तितकं मी केलेलं आहे. आता त्याचा निर्णय, असं अजित पवार म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

रयत शिक्षण संस्थेत सुरू झाला दळवी पॅटर्न; कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

  कान्हुर पठार मधील तो विकृत शिक्षक अखेर निलंबित पारनेर / नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील कान्हूर पठार,...

कान्हूरपठारकरांनी गावासह शाळाही ठेवली बंद

शेकडो पालकांसह ग्रामस्थांचा आक्रोश | ‌‘रयत‌’ च्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती | विद्याथनींमध्ये घबराटीचे वातावरण ‌‘रयत‌’ची...

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं, लाखो महिला अपात्र, पहा कारण

मुंबई / नगर सह्याद्री : लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार असल्याचे...

पैसे वसुलीस नेमलेल्यांनीच परदेशींचा काढला काटा!

10 कोंटींची खंडणी मिळत नसल्याने आवळला गळा | मृतदेह नालीत फेकला अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर...