spot_img
अहमदनगरAhmednagar politics: गावकीच्या निवडणुकीतील सहभाग लंके यांना नडणार! 'त्या' १४०० उमेदवारांची भावना...

Ahmednagar politics: गावकीच्या निवडणुकीतील सहभाग लंके यांना नडणार! ‘त्या’ १४०० उमेदवारांची भावना नेमकी काय? पहा..

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
गावपातळीवरील ग्रामपंचायत आणि सोसायटी निवडणुकीत कोणताही आमदार अथवा खासदार लक्ष घालत नाही. मात्र, पारनेर तालुक्याचे तत्कालीन आमदार नीलेश लंके हे त्यास अपवाद ठरले आणि त्यांनी गावागावातील ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या निवडणुकीत समर्थकांच्या विजयासाठी जाहीर सभा घेतल्या! त्यातून विजयी झालेले त्यांचे समर्थक त्यांच्या सोबत आणि पराभूत झालेले त्यांच्या विरोधात गेले. याशिवाय विरोधात सभा घेऊनही लंके यांच्या विरोधात विजयी झालेल्यांची संख्या देखील मोठी! आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने लंके यांच्या विरोधात हे सारेच एकत्र आल्याचे दिसून येत आहे.

तीन वर्षापूर्वी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा मोठा धुराळा उडाला होता. याच टप्प्यात पारनेर तालुक्यात ८९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. विधानसभेनंतर लागलीच या निवडणूका झाल्या! साठ हजारापेक्षा जास्त मतांनी निवडून आल्याने नीलेश लंके यांच्या डोक्यात हवा भरली. गावागावात लंके यांच्या विरोधात विधानसभेला ज्यांनी मतदान केले त्यांच्या विरोधात याच लंके यांनी पॅनल तयार केले. त्या निवडणुकीत लंके यांनी गावागावात जाऊन जाहीर सभा घेतल्या आणि ८९ ग्रामपंचायतींमध्ये समर्थकांना मतदान करण्याचे आवाहन केले.

तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींचा आढावा घेतला गेल्यास एका पॅनलच्या उमेदवारांची साधारणपणे ८९ गावांची मिळून ८०० पेक्षा जास्त संख्या होते. कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त १५ अशी सदस्य संख्या ग्रामपंचायतीमध्ये राहते. किमान ९ सदस्य संख्या गृहीत धरली तर ८९ ग्रामपंचायतींमध्ये एका पॅनलसाठी ८०१ उमेदवार राहतात. म्हणजेच ८०१ उमेदवार विजयी झालेत आणि तितकेच किंबहूना त्याहीपेक्षा जास्त उमेदवार पराभूत झालेत! ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनलमध्ये उमेदवारी करणारा किमान १०० मतांचा मालक असतो.

मात्र, आपण असा उमेदवार ५० मतांचाच मालक असल्याचे गृहीत धरले तर ८०१ उमेदवार आणि त्यांची ५० मते याचा गुणाकार केल्यास ती येते ४० हजार ५०. याशिवाय विकास सोसायट्यांमधील पराभूत वेगळेच! विकास सोसायट्यांमध्ये पराभूत केलेल्या एकूण संचालकांची मते वीस हजार गृहीत धरली तर ग्रामपंचायत आणि विकास सोसायट्यांची मिळून ६० हजार मते ही विरोधात आहेत.

या साठ हजार मतांची ताकद आता लोकसभा निवडणुकीत आम्हाला दाखवून द्यावी लागणार असल्याची भावना या पराभूत उमेदवारांमध्ये निर्माण झाली आहे. कायम दादागिरी आणि दंडुकेशाहीची भाषा बोलणार्‍यांनी आमच्या गावात येऊन आमच्या विरोधात भाषणे ठोकली. आम्हाला पराभूत केले. वास्तविक पाहता आम्ही त्यांना विधानसभेला मतदान केले होते. आम्ही त्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली असतानाही त्यांनी आमच्या गावात येऊन, काहींना फोन करून आमच्या विरोधात मतदान करण्यास भाग पाडले. गावकीची बाब असतानाही त्यांनी उन्माद केला. आता आम्हाला लोकशाही मार्गाने आमची भूमिका पार पाडायची असल्याचे या पराभूत उमेदवारांनी म्हटले आहे. एकूणच स्वत:च्याच तालुक्यात मतदान दोन दिवसांवर आलेले असताना ग्रामपंचायत- सोसायटीत पराभूत झालेल्या बहुतांश उमेदवारांनी एकत्र येत घेतलेली ही भूमिका निर्णायक ठरु शकते.

त्याने आम्हाला पाडले आता आम्ही त्याला सुट्टी देत नसतो!
गावागावात ग्रामपंचायत आणि विकास सोसायटी निवडणुकीत तुम्ही कोणामुळे पडलात, आठवतेय ना? आता संधी आलीय, तुम्हाला पाडण्यासाठी त्याने तुमच्या गावात येऊन सभा घेतली. तुम्ही त्याच्या विरोधात सभा घेऊ शकत नसले तरी तुमच्या विरोधात सभा घेणार्‍याच्या विरोधात फक्त मतदान करु शकता. गावकीच्या निवडणुकीत याआधी कोणत्याच आमदाराने लक्ष घातले नसताना त्याने लक्ष घातले आणि तुम्हाला पाडले! आता वेळ आलीय फक्त विरोधी बटन दाबण्याची! तुम्ही स्वत: आणि तुम्हाला माननारी फक्त ५० मते याची ताकद काय आहे हे दाखवून देण्याच्या संधीचे सोने करा असे आवाहन करणार्‍या पोस्ट ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेल्या काही उमेदवारांनी सोशल मियिडावर शेअर केल्या आहेत.

पारनेरकर म्हणताहेत, आम्ही भोगलंय, तुम्ही बोध घ्या!
सामान्य कुटुंबातील हे पोरगं प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन लढत असल्याचं कौतुक आम्हाला होतं. त्यातच त्यावेळचे आमदार विजय औटी यांच्या तुसडेपणाच्या स्वभावाचा बोभाटा उठवला गेला आणि सामान्य कुटुंबातील पोरगा आमदार करायचा असं आम्ही ठरवलं. साठ हजाराचं मताधिक्य दिलं आणि आमदार केला. चारच महिन्यात ग्रामपंचायत- सोसायटीच्या निवडणुका लागल्या आणि त्याच सामान्य पोराने आमदार होताच गावागावात विघ्नसंतोषी पोरांना हाताशी धरले आणि बिहारी स्टाईलने निवडणुका केल्या. आता लोकसभा निवडणूक होताच हाच पॅटर्न पारनेरच्या बाहेर राबवला जाऊ शकतो आणि त्यातून संपूर्ण लोकसभा मतदारसंघात दहशत निर्माण केली जाऊ शकते याची जाणिव करून देतानाच हिवरेबाजार- राळेगणसिद्धी ही गावे देखील त्यांनी सोडली नसल्याची पुष्टीही यात जोडण्यात आलीय! आम्ही भोगलंय, तुम्ही बोध घ्या, अशी टॅगलाईन यासाठी वापरली गेलीय!

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...