spot_img
अहमदनगरAhmednagar: कांदा आंदोलनकर्त्यांची आडते, व्यापार्‍यांना शिवीगाळ ! व्यापाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय? वाचा...

Ahmednagar: कांदा आंदोलनकर्त्यांची आडते, व्यापार्‍यांना शिवीगाळ ! व्यापाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय? वाचा सविस्तर 

spot_img
अहमदनगर ।  नगर सहयाद्री 
सरकारने कांदा निर्यातीवील बंदी हटविली. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पाकिस्तान, चीन, इजिप्त इरान देशांनी ताबडतोब दुसर्‍याच दिवशी कांद्यावरील निर्यात शुल्क कमी केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भाव कोसळले. राज्यातील सर्व कांदा बाजारपेळेत मोठ्या प्रमाणात आवक आली. त्यामुळे कांद्याचे भाव कोसळले. याची कोणतीही माहिती न घेता राजकीय हित डोळ्यासमोर ठेवून आंदोलनकर्त्यांनी आडते व व्यापार्‍यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच पंतप्रधान यांच्याबद्दल अपशब्द वापरले. याचा आडते व व्यापारी असोसिएशनच्यावतीने निषेध नोंदवला आहे. 
गुरुवार दि. ९ मे रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती, नेप्ती येथे कांदा लिलाव सुरुळीत चालू असताना काही राजकिय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी बाजार समितीत उपस्थित राहून राजकिय हेतू साधण्याकरीता कांदा बाजार भावा संदर्भात विनाकारण आरडा ओरड करण्यास सुरुवात केली.  व्यापार्‍यांना जबरदस्ती करुन कांदा लिलाव बंद पाडण्यास भाग पाडले. बाळासाहेब हराळ व त्यांच्या सहकार्यांनी पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरले. तसेच आडते व व्यापार्‍यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. याचा आडते, व्यापार्‍यांकडून निषेद व्यक्त करण्यात आला.
कांदा बाजार भाव हे आंतरराष्ट्रीय पातळीवर तसेच देशातील सर्व प्रमुख बाजारपेठेवर अवलंबून असतात. याची आंदोलन कर्त्यांना कोणतेही ज्ञान नाही. केवळ राजकिय हित डोळयापुढे ठेऊन त्यांनी बाजार समिती व व्यापार्‍यांवर बिनबुडाचे आरोप केले. कांदा लिलाव तीन तास बंद राहिले. या आंदोलनाची देश पातळीवर झाली. परिणाम बाजार भावावर कमी झाला. शेतकर्‍यांच्या कांद्याला दोन ते तीन रुपये किलोमागे भाव कमी मिळाला.
आंदोलनामुळे शेतकरी व व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक त्रास भोगावा लागला. यापुढे आंदोलक कर्त्यांनी राजकिय हितापोटी कांदा उत्पादक शेतक-यांस व आडते व्यापारी वर्गास वेठिस धरु नये. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व भारतीय बाजार पेठ या विषयी योग्य माहिती घेऊन आंदोलन करावे. विनाकारण व्यापारी व बाजार समितीवर आरोप करु नये असे कांदा व्यापारी असोसिएशनने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...