अहमदनगर | नगर सह्याद्री
सध्या देशात लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुक ठाणे जिल्हा येथे बंदोबस्ताकरीता गेलेले होमगार्ड हे छत्रपती संभाजीनगर येथे परतत असताना त्यांच्या ट्रॅव्हल बसवर कोपरगाव तालुक्यातील समृद्धी मार्गावर अज्ञात इसमांनी दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचा फुटल्या असून यात बसचे नुकसान झाले आहे. तर चालक किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने पोलीस कर्मचारी, होमगार्ड, सैनिक यांना बंदोबस्त करता एका ठिकानाहून दुसर्या ठिकाणी नेआन करावी लागत आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक बंदोबस्ताच्या अनुशंगाने छत्रपती संभाजीनगर येथून ठाणे जिल्हा येथे बंदोबस्ताकरीता आलेले ४२ होमगार्ड यांनाठाणे येथून छत्रपती संभाजीनगर येथे सोडविण्याकरीता ट्रॅव्हल बसमधून चालेले होते.
परंतु रात्री (२२ मे) साडेबारा वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी पूल, समृध्दी हायवे रोडवर, कोपरगांव येथे अज्ञात इसमांनी ट्रॅव्हल बसच्या समोरील काचवर दगडफेक केली.या घटनेत बस चालक आश्पाक युसूफ शेख (वय ३७ वर्षे) हे जखमी झाले आहे. या प्रकरणी आश्पाक युसूफ शेख यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसांनी अज्ञात इसमां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस हल्लाखोरांचा शोध घेत आहे.