spot_img
अहमदनगरAhmednagar News: अनधिकृत होर्डिंग्जबाबत महापालिकेने उचलले कठोर पाऊल

Ahmednagar News: अनधिकृत होर्डिंग्जबाबत महापालिकेने उचलले कठोर पाऊल

spot_img

८३ होर्डिंग्ज अनधिकृत | ४४ होर्डिंग्जचा परवाना संपला
अहमदनगर | नगर सह्याद्री
शहर व उपनगर परिसरात महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ३८४ परवानाधारक होर्डिंग्जसह तब्बल ८३ अनधिकृत होर्डिंग्ज आढळून आले आहेत. तसेच, ४४ होर्डिंग्जचा परवाना संपुष्टात आलेला आहे. या सर्व होर्डिंग्ज मालकांना तत्काळ नोटीसा बजावण्याचे आदेश प्रभाग अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. येत्या सोमवारपासून अनधिकृत होर्डिंग्ज उतरवण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी दिली.

मुंबई येथील घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी शहरातील अनधिकृत होर्डिंग्जचा सर्वे करण्याचे आदेश दिले होते. अतिरिक्त आयुक्त जोशी यांच्यावर ही जबाबदारी सोपवून सर्वेक्षणासाठी चारही प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीत उपायुक्तांच्या नियंत्रणाखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने बुधवारी अहवाल सादर केल्यावर अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी आढावा घेतला. सावेडी प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत ३८, माळीवाडा (शहर) कार्यालयाच्या हद्दीत १५, झेंडीगेट २१ व बुरुडगाव कार्यालयाच्या हद्दीत ९ असे ८३ अनधिकृत होर्डिंग्ज आढळून आले.

तसेच, परवाना संपुष्टात आलेले ४४ होर्डिंग्ज असल्याचे तपासणीत समोर आले आहे. या सर्वांना तत्काळ होर्डिंग्ज काढून घेण्याच्या नोटीसा बजावण्यात याव्यात. सोमवारपासून प्रत्यक्ष कारवाई सुरू करावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी दिले आहेत.दरम्यान, शहरात परवाने देण्यात आलेल्या ३८४ होर्डिंग्जचीही तपासणी केली जाणार आहे.

होर्डिंग्जला परवानगी देताना शासनाने निश्चित केलेल्या नियमांचे पालन केले आहे का, परवानगीनुसार त्याच आकाराचे होर्डिंग्ज आहे की मोठे आहे, होर्डिंग्ज योग्य पद्धतीने शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार उभारले आहेत का, इमारतीवर होर्डिंग्ज असल्यास त्या इमारतीचे व ज्यावर होर्डिंग्ज उभारले आहे, त्याचे स्ट्रचरल ऑडिट झाले आहे का, आदी विविध मुद्द्यांवर येत्या आठ दिवसांत तपासणी केली जाणार असल्याचेही अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी सांगितले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...