spot_img
ब्रेकिंगSSC HSC Result: दहावी- बारावी परीक्षेचा निकालाबाबत मोठी अपडेट; कधी लागणार निकाल...

SSC HSC Result: दहावी- बारावी परीक्षेचा निकालाबाबत मोठी अपडेट; कधी लागणार निकाल शिक्षण मंडळाने दिली माहिती

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
SSC HSC Result: राज्यात सध्या दहावी- बारावीच्या परीक्षा संपून आता वेळ झाला आहे. दरम्यान दहावी, बारावी परीक्षानंतर विद्यार्थी, पालक सुट्ट्यांचे नियोजन करु लागलेयत. दरम्यान परीक्षांनंतर आता मुलांचे निकाल कधी लागणार? याचे पालकांना वेध लागले आहेत. दरम्यान दहावी, बारावीच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांची 11 फेब्रुवारीपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांची 21 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू झाली होती. दरम्यान दहावी, बारावी निकालासाठी विद्यार्थी, पालकांना जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही. कारण दहावी, बारावी परीक्षांचे निकाल मे मध्येच जाहीर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांकडून तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा आढावा अधिकारी दररोज घेत आहेत.

21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी बारावीच्या 21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा, तर दुसर्‍या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच तारीख जाहीर केल्या जातील असेही बोर्डाकडून सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ही माहिती दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! रस्त्यावर कचरा टाकणे आता पडणार महागात

मनपा दंडात्मक कारवाई करेल ः आमदार संग्राम जगताप | पाईपलाईन रोड परिसरामध्ये राबवले स्वच्छता...

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण, नगरमध्ये घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मागील जेवणाचे बिल मागितल्याचा रागातून एका ग्राहकाने हॉटेल चालकावर लोखंडी रॉडने...

अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; कसे आहे नियोजन, वाचा सविस्तर

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना...

२२ कोटींच्या फायद्याचे आमिष दाखवून प्राध्यापकाला ३ कोटी ३ लाखांचा गंडा

तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री भाग बाजारामध्ये भरघोस परताव्याचे आमिष...