spot_img
मनोरंजनसईच्या कमेंटवर सोनाली कुलकर्णीचा जबरदस्त सवाल

सईच्या कमेंटवर सोनाली कुलकर्णीचा जबरदस्त सवाल

spot_img

मुंबई ः अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहते. तिच्या फॅशनची भुरळ फक्त चाहत्यांनाच नाही तर, अनेक सेलिब्रिटींवरही पडली आहे. नुकतंच सोनालीने सोशल मीडियावर सोनालीने काही फोटोज शेअर केले आहेत.

तिच्या नव्या फोटोंवर अभिनेत्री आणि सोनालीची बेस्ट फ्रेंड म्हणून चर्चेत राहणारी सई ताम्हणकरने एक कमेंट केली आहे. त्या कमेंटमुळे दोघीही सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आल्या आहे. सोनाली कुलकर्णी हिने नुकतंच दुबईमध्ये एक नवं आलिशान घर खरेदी केलं आहे. पती कुणाल बेनोडेकरसोबत सोनाली आपल्या दुबईच्या नव्या घरात पाडवा साजरा केला. दिवाळीमध्ये सोनालीने पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत ही गुडन्यूज शेअर केली.

त्याच पोस्टवर अभिनेत्री सई ताम्हणकरने यूट’ म्हणत एक कमेंट केली आहे. यावर सोनालीने ओके, पण तुझ्या नवीन घरात कधी बोलवतेय ते सांग आधी’ सईला अशी कमेंट केली आहे.

या कमेंटवर सईने तुमचं दुबई, लंडन झालं की सांगा मॅडम’ सोनालीला अशी कमेंट केली आहे. पुढे सोनालीने राहू दे, राहू दे’ अशी कमेंट केली आहे. यावर सईने हा काय आता’ अशी कमेंट केली. या दोन्ही बेस्ट फ्रेंडच्या कमेंटची चांगलीच चर्चा होते. या दोघींचीही मैत्री फार जुनी असून कायमच सोशल मीडियावर एकमेकींसोबतचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत राहतात. सोनालीने दुबईमध्ये नवं घर खरेदी केलं आहे. फोटोच्या माध्यमातून सोनालीने तिच्या नव्या आलिशान घराची झलक दाखवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...