spot_img
ब्रेकिंग...म्हणून तर खासदार लंके मविआत गेले! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट

…म्हणून तर खासदार लंके मविआत गेले! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री:-
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पारनेरचे तत्कालीन आमदार नीलेश लंके यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. प्रवेश करताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि नीलेश लंके निवडूनही आले. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे यांचा पराभव केला. नगर लोकसभेची निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान, निलेश लंकेंच्या लोकसभा निवडणूक लढण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पांमध्ये मोठे गौप्यस्फोट केले आहेत.

यावेळी अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी नीलेश लंके सुरुवातीला माझ्याकडून तयार होते. मात्र मला लोकसभा आणि माझ्या पत्नीला विधानसभा देण्यात यावी, नीलेश लंके यांनी केली होती, असे अजित पवार यांनी सांगितले. निलेश लंकेंच्या उमेदवारीबाबत मी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली होती. मात्र त्यांचा विद्यमान खासदार असल्यामुळे ती जागा सोडू शकले नाही. ही जागा धोयात आहे, असेही मी त्यांना त्यावेळी सांगितले होते. मात्र भाजपच्या नेत्यांनी ऐकले नाही.

पालकमंत्र्यांनी मला मोठ्या प्रमाणावर त्रास दिला होता. माझ्या जवळच्या लोकांच्या क्रशर आणि इतर खाणी बंद केल्यामुळे मला त्याचा फटका बसणार होता. त्यामुळे मी त्याच्यासोबत (पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील) काम करु शकत नाही, असे नीलेश लंके यांनी स्पष्ट सांगितले होते. त्यानंतर त्यांनी शरद पवार गटात जाऊन निवडणूक लढवली असल्याचे अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना सांगितले असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

अजित पवार यांनी आचारसंहिता पाळावी
विखे पालटांनी निलेश लंके यांना खूप त्रास दिला. त्यामुळेच निलेश लंके हे महाविकास आघाडीसोबत गेले असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक बैठकीमध्ये केले होते. यावरून महायुतीमध्ये अनेक खटके उडत असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवारांसारख्या नेत्याने असे बोलणे योग्य नाही अशी प्रतिक्रीया भाजप नेते आ. प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलतांना दिली. ते म्हणाले, अजित पवारांनी आचारसंहिता पाळावी. जेणेकरून महायुतीवर परिणाम होणार नाही. अशी उणी-धुणी काढायचे म्हटलं तर आम्ही देखील ते काढू. मला वाटते अजित पवारांसारख्या नेत्याने अशा प्रकारचे वक्तव्य केले असेल तर ते योग्य नाही. शिवाजीराव आढळराव पाटील भाजपकडून लढले असते तर आम्ही जिंकलो असतो, असे आम्ही म्हणू शकतो, असे दरेकर म्हणाले.

खा. नीलेश लंके यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला
राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र नगर लोकसभा मतदारसंघाची चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच आता नगर आणि माढावरून निलेश लंके आणि अजित पवारांमध्ये जुंपल्याचे चित्र आहे. अजित पवार यांनी पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पांमध्ये केलेल्या विधानावर खा.लंके यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, नगर आणि माढाबाबत करण्यात आलेले वक्तव्य म्हणजे शिळ्या कढीला उत देण्याचा प्रकार आहे, असा टोला खा. लंके यांनी अजित पवारांना लगावला. तसेच मी (नीलेश लंके) आणि धैर्यशील मोहिते पाटील निवडून आलो आहोत. खासदार झालोय. आता त्या गोष्टीला महत्त्व राहिले नाही, असेही खासदार नीलेश लंके यांनी सांगत पलटवार केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नडणाऱ्यांसह काँग्रेस अन्‌‍ ठाकरे सेना क्लीन बोल्ड

महानगरपालिकेत डॉ. सुजय विखे पाटील -आमदार संग्राम जगताप एक्सप्रेेस निर्णायक ठरणार! सारिपाट / शिवाजी शिर्के प्रभाग...

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच तरुणाचा बळी!, कळस येथील घटनेला जबाबदार कोण?

पिंजरा लावण्याची जबाबदारी का झटकली? गणेश जगदाळे। पारनेर पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या जुन्नर तालुका राज्यात बिबट्या...

जिल्ह्यात लेझर लाईट, दबाव हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर बंदी

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) नुसार...

मैदान ठरलं; तोडफोडीमुळे ‘अशी’ राजकीय गणिते बदलली!, आता आरक्षणाकडे नजरा..

सुनिल चोभे | नगर सह्याद्री अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची उलटगणती सुरु झाली असून निवडणुकीचा राजकीय रंग...