spot_img
अहमदनगरAhmednagar: .. तर 'त्या' अनुदानापासून 'शेतकरी' वंचित राहणार नाही!! मंत्री विखे पाटील...

Ahmednagar: .. तर ‘त्या’ अनुदानापासून ‘शेतकरी’ वंचित राहणार नाही!! मंत्री विखे पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

spot_img

शिर्डी। नगर सहयाद्री-
शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या दूध अनुदानापासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी असे स्पष्ट निर्देश राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अधिकाऱ्यांना दिले. ते मुंबईत बोलत होते.

राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधासाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले आहे. या दूध अनुदानबाबत मंत्री विखे पाटील यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे एका बैठकीत आढावा घेतला या दूध अनुदानापासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता संबधित यंत्रणेने घ्यावी, अशसूचना महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

शासनाने जाहीर केलेले दूध अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यास मिळण्यासाठी त्यांच्या जनावरांचे टॅगींग होणे महत्त्वाचे आहे. पशुधनाचे टॅगींग व्हावे, यासाठीचे काम अचूकरित्या पूर्ण केल्यास सर्वांना अनुदानाचा लाभ मिळेल, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

या बैठकीस पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे, आयुक्त प्रशांत मोहड, सहा निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) शहाजी पाटील यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध जिल्ह्यातील अधिकारी सहभागी झाले होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...