spot_img
ब्रेकिंगमनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करा ! विधानसभा अध्यक्षांचे आदेश

मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करा ! विधानसभा अध्यक्षांचे आदेश

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर एसआयटीमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मंगळवारी विधानसभेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला. अंतरवली सराटीत झालेल्या दगडफेकीचे विधानसभेत पडसाद उमटले.

या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्यावरही सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील हे कट कारस्थानाची भाषा बोलत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी तर अंतरवली सराटी प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामागे राष्ट्रवादी असेल तर या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. विधानसभा अध्यक्षांनीही याप्रकरणी एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली. त्यानंतर, विधानपरिषदेत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरुन माजी विरोधी पक्षनेते आणि आमदार प्रविण दरेकरही चांगलेच आक्रमक झाले. आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप करत, आमदार राजेश टोपे यांच्या कारखान्यावर आंदोलनाचे षडयंत्र रचले जात होते, असा गंभीर आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे.

जरांगेंच्या सभेच्या खर्चाबाबतचा प्रश्न करत दरेकर यांनी दगडफेकीच्या घटनेची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. तसेच, जर केंद्रीयमंत्री नारायण राणेंना अटक होऊ शकते, केवळ मुख्यमंत्र्यांना चापट मारेल, असं बोलल्यानंतर मंत्री महोदयांना अटक केली होती. मग, मनोज जरांगेंना अटक का होत नाही. मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, अशी मागणीही दरेकर यांनी विधानपरिषदेत केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ट्रॅक्टरच्या टायरमध्ये का भरलं जात पाणी? अनेकांना पडलेला महत्वाचा प्रश्न, वाचा त्यामागचं कारण

मुंबई । नगर सहयाद्री:- आपण इतर वाहनांच्या टायरमध्ये हवा भरतो, पण ट्रॅक्टरच्या टायरमध्ये हवेऐवजी...

बाप रे! बर्फाच्या कारखान्यात धक्कादायक प्रकार; कामगाराच्या डोक्यात ‘इतके’ टाके

जामखेड । नगर सहयाद्री:- जामखेड येथे बर्फ कारखान्यात गेल्या आठ वर्षापासून कामाला असलेल्या परप्रांतीय...

मेहुणीला करायचं होतं भाऊजीला खूश, पुढे घडलं असं काही….

Crime News : सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्यासाठी काही लोक कोणत्याही स्तरावर जाऊन...

अजबच! ‘सिबिल स्कोअर’ खराब असल्याने मोडलं लग्न..

Maharashtra News: सामान्य ग्राहकाला कर्ज देताना बँका त्या ग्राहकाच्या परतफेडीच्या क्षमतेसोबतच त्याच्या ‘सिबिल स्कोअर’चासुद्धा...