spot_img
अहमदनगर'साहेब काहीतरी वेगळा निर्णय घ्या'! मंत्री भुजबळ यांची समता परिषदेआड नवी चाल

‘साहेब काहीतरी वेगळा निर्णय घ्या’! मंत्री भुजबळ यांची समता परिषदेआड नवी चाल

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री:-
नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी नाकारल्यापाठोपाठ राज्यसभेच्या जागेसाठीही नाकारण्यात आल्यानंतर अस्वस्थ झालेले छगन भुजबळ हे सध्या समता परिषदेच्या आडून मोठी राजकीय खेळण्याच्या तयारीत आहेत. महायुतीतील मंत्रीपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असणारे भुजबळ हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह काँग्रेसचा पर्याय निवडण्याच्या मन:स्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवार यांनी सिन्नरच्या जाहीर सभेत भुजबळ यांची खरडपट्टी काढली असल्याने ते शरद पवार यांच्यासोबत जाणार नसल्याचे सांगण्यात येते. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात पुन्हा एकदा ओबीसी संघटन आणि आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असल्याने भुजबळ यांच्या बंडाचे निशाण कोणत्याही क्षणी फडकल्यास आश्चर्य वाटू नये. छगन भुजबळांनी स्थापन केलेल्या समता परिषदेची नुकतीच मुंबईत बैठक झाली. भविष्याचा विचार करुन भुजबळांनी योग्य निर्णय घ्यावा. समता परिषद त्यांच्या सोबत असेल असं पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात आलं.

पक्षात होत असलेली भुजबळांची कोंडी पाहता समता परिषदेकडून भुजबळांवर दबाव आणला जात असल्याचं बोललं जातं. त्यामुळे भुजबळ काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.वेगळा निर्णय घेण्यासाठी समता परिषदेकडून टाकला जाणारा दबाव भुजबळांचीच खेळी असल्याची चर्चा आहे. कारण समता परिषद ही भुजबळांचीच संघटना आहे. त्यामुळे या संघटनेकडून भुजबळांवर दबाव टाकला जाईल का, हा प्रश्न आहे. संघटनेचा दबाव असल्याचं सांगून भुजबळ अन्य कोणावर दबाव टाकत आहेत का, हा खरा प्रश्न आहे. कारण सध्या तरी पक्षात त्यांना सातत्यानं डावलण्यात येत आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर छगन भुजबळांनी ओबीसींसाठी ठाम भूमिका घेतली. ओबीसी समाजासाठी मेळावे घेतले. त्यामुळे मराठा समाजात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीबद्दल गेलेला संदेश सत्ताधार्‍यांना लोकसभेत महागात पडला. मराठा समाजात भुजबळांची असलेली प्रतिमा पाहूनच त्यांना आधी लोकसभेला आणि मग राज्यसभेवर संधी नाकारण्यात आल्याचं बोललं जात आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता छगन भुजबळ मंत्रिपदाचा राजीनामा देऊन महायुती सरकारमधून बाहेर पडू शकतात. ते त्यांच्या जुन्या पक्षात म्हणजेच शिवसेनेत परतण्याची शयता आहे. कधीकाळी कट्टर शिवसैनिक असलेले भुजबळ यांनी सेनेत बंड करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

शरद पवारांनी काँग्रेस सोडल्यानंतर भुजबळही पक्षातून बाहेर पडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर भुजबळांनी अजित पवारांची साथ दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण या दोन्ही नेत्यांमध्ये कायम स्पर्धा राहिली आहे. भुजबळ हे अजित पवारांना राजकारणात सीनियर आहेत.छगन भुजबळ पुन्हा शरद पवारांकडे परतण्याची शयता अतिशय कमी आहे. पक्षफुटीनंतर शरद पवारांनी येवल्यात घेतलेली सभा भुजबळांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे आता भुजबळांकडे ठाकरेसेना आणि काँग्रेस असे दोन पर्याय उरतात. या दोन्ही पक्षांमध्ये त्यांनी आधी काम केलेलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक: व्यापार्‍यांच्या जमीनीवर ताबेमारी, कुठे घडली घटना…

व्यापार्‍यांनी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली घेतली एसपींची भेट अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यात शहरातील व्यापार्‍यांच्या...

मार्केटींगसाठी ठेवलेल्या मुलीवर अत्याचार; पती-पत्नी आरोपी, कुठे घडला प्रकार पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मार्केटींगचे काम करण्यासाठी ठेवलेल्या अल्पवयीन मुलीसोबत (वय १७) वारंवार शरीर संबंध...

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान नगरला; आमदार संग्राम जगताप म्हणाले…

नियोजनाची बैठक | महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार अहिल्यानगर |...

धुक्यात नगर हरवले; नगर-सोलापूर रोडवर अपघात; मोठा अनर्थ टळला

  अहिल्यानगर | नगर सह्याद्री डिसेंबर महिन्यातील कडाक्याच्या थंडीचा अंमल संपून काही दिवस ढगाळ वातावरणाने नगर...