spot_img
अहमदनगरधक्कादायक! पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, घडले असे...

धक्कादायक! पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, घडले असे…

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने अतिप्रमाणात औषधाचे सेवन (वेगवेगळ्या प्रकारच्या 10 ते 12 औषधी गोळ्या) केल्याची घटना भिंगारमध्ये घडली. कोमल राहुल कुदळे (वय 29 रा. विजय लाईन चौक, भिंगार) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल वसंत कुदळे (रा. विजय लाईन चौक, भिंगार) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. सदरची घटना 10 नोव्हेंबर रोजी दुपारी घडली असून गुन्हा 13 नोव्हेंबर रोजी दाखल झाला आहे. राहुल व त्याची पत्नी कोमल भिंगार शहरातील विजय लाईन चौक परिसरात एकत्र राहत असताना राहुल तिला दारू पिऊन शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करत होता. त्यांच्याकडे सोन्याच्या दागिन्याची मागणी केली होती.

त्याच्या या त्रासाला कंटाळून कोमल यांनी 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अतिप्रमाणात औषधाचे सेवन (वेगवेगळ्या प्रकारच्या 10 ते 12 औषधी गोळ्या) केले. यामुळे कोमल यांना त्रास होवू लागल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान त्यांनी पोलिसांना जबाब दिला असून पोलिसांनी जबाबावरून राहुल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार व्ही. आर. राठोड करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पळसपूरात गावठी दारू अड्डयावर धाडसत्र ! १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघांना अटक

  स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पारनेर / नगर सह्याद्री- तालुक्यातील पळसपूर शिवारातील निर्जन गायरानात सुरू असलेल्या अवैध...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे रविवारी अनावरण; कोण कोण राहणार उपस्थित पहा

मार्केट यार्ड चौक येथे महानगरपालिकेच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन / कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीच्या मार्गात...

भयंकर! चालत्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये पेशंटवर अत्याचार, कुठे घडला प्रकार पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - एक अतिशय धक्कादायक अशी घटना पुढे आली. होमगार्डच्या भरतीसाठी...

लाडकी बहीण योजनेबद्दल अजितदादांकडून मोठी अपडेट; ‘त्या’ महिलांसह पुरुषांना बसणार झटका!

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे,...