spot_img
अहमदनगरAhmednagar Crime News : धक्कादायक! कर्ज हप्त्याच्या रकमेचा अपहार; कोणत्या बँकेतील प्रकार,वाचा...

Ahmednagar Crime News : धक्कादायक! कर्ज हप्त्याच्या रकमेचा अपहार; कोणत्या बँकेतील प्रकार,वाचा सविस्तर

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री – 
Ahmednagar Crime News : कोटक महिंद्रा बँकेच्या नागापूर शाखेतील दोन कर्मचार्‍यांनी ग्राहकांकडून कर्ज हप्त्याची जमा केलेली सात लाख ३१ हजार ९२० रूपयांची रक्कम बँकेत न भरता परस्पर अपहार करून फसवणूक केली. या प्रकरणी कोटक महिंद्रा बँकेच्या नागापूर शाखेचे मॅनेजर संजय रघुनाथ भंडारे (वय ४५ रा. सारसनगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादीवरून कर्मचारी गोविंद बबन गाडे (रा. कांबी, ता. शेवगाव) व सागर तुळशीराम शिंदे (रा. ढवळगाव, ता. श्रीगोंदा) यांच्या विरोधात अपहार, फसवणूक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. कोटक महिंद्र बँकेच्या नागापूर शाखेतील वसुली प्रतिनिधी म्हणून काम करणारे गाडे व शिंदे यांनी बँकेच्या ग्राहकांकडून कर्ज हप्त्याची सात लाख ३१ हजार ९२० रूपयांची रक्कम जमा केली.

ती बँकेत न भरता परस्पर अपहार केला. यासंदर्भात बँकेने पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. पोलिसांनी अर्जाची चौकशी केली असता अपहार झाल्याचे समोर आले. यावरून मॅनेजर भंडारे यांनी मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मे २०२३ मध्ये गाडे व शिंदे यांनी बँकेच्या कर्जदार ग्राहकांकडून कर्जहप्त्याची रक्कम रोख स्वरूपात जमा केली होती.

ही रक्कम कर्जदारांच्या खात्यात भरणे बंधनकारक असताना त्या दोघांनी त्याचा अपहार केला. कर्जाच्या हप्त्याच्या रक्कमेबाबत कर्जदारांकडे मागणी केली असता हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर पोलिसांत तक्रार अर्ज दाखल करण्यात आला. पोलिसांनी तक्रार अर्जाची चौकशी करून दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ईश्वरी तुपे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

  अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक...

शांताराम लंके यांचे सामाजिक कार्य मोठे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

निघोज / नगर सह्याद्री : कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम लंके यांचे सामाजिक कार्य...

दगाफटका केल्यास सरकारचा कार्यक्रमच लावणार; जरांगे पाटील काय म्हणाले पहा…

बीड / नगर सह्याद्री - मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच...

शेअर ट्रेडिंगमध्ये अधिक नफा मिळवून देण्याच्या आमिषाने ५० लाखांची ऑनलाईन फसवणूक

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून...