spot_img
अहमदनगरAhmednagar News : आ. लंके समर्थकाची पारनेरमध्ये दंडुकेशाही; न्यायालयात दावा दाखल असताना...

Ahmednagar News : आ. लंके समर्थकाची पारनेरमध्ये दंडुकेशाही; न्यायालयात दावा दाखल असताना केली जमिनीची खरेदी

spot_img

मुलीने मागितला थेट मुख्यमंत्र्यांकडे न्याय
पारनेर | नगर सह्याद्री :
Ahmednagar News : आई- वडिलांच्या जमिनीत वारसाहक्काने वाटा मिळण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला असतानाही त्याच जमिनीची विक्री करण्यात आली. आईच्या विरोधात हा दावा दाखल असल्याचे माहिती असूनही पारनेर बाजार समितीचा उपसभापती भाऊसाहेब ऊर्फ बापू शिर्के याने आपल्या आईला अमिष दाखवत, अधिकार्‍यांना हाताशी धरत जमिनीची खरेदी केल्याचा आरोप सौ. तनुजा प्रकाश डावखर या महिलेने केला आहे. दंडेलशाही आणि दादागिरीच्या जिवावर आ. नीलेश लंके यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगतानाच मी या विषयावर काही बोलू नये म्हणून माझ्या घरावर दगडफेक केली जात असल्याचा आरोपही सौ. डावखर यांनी केला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले असून न्याय देण्याची मागणी करतानाच हे खरेदीखत रद्द करण्यात यावे आणि यासाठी मदत करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणीही डावखर यांनी केली आहे.

यासंबंधीच्या निवेदनात सौ. डावखर यांनी म्हटले आहे की, माझी आई सौ. पुष्पा संतोष उंडे हीचे आणि वडिल यांच्यात कौटुंबिक वाद आहेत. आई सौ. पुष्पा साधारणपणे ऑक्टोबर २०२२ पासून माझ्या वडिलांसोबत राहत नाही. माझे आजोबा (वडिलांचे वडिल) श्री. बाबाजी उर्फ श्रीपती ठमाजी उंडे यांनी त्यांच्या नावावर असणारी कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथील गट नं. ८५६ व १११९ या दोन गटातील जमीन त्यांच्या दोन्ही सुनांच्या नावाने वाटप केले होते. त्यानुसार या दोन गटातील जमीन माझी आई सौ. पुष्पा संतोष उंडे हिच्या नावे लागली. वडिलांसोबत मतभेद झाल्यानंतर माझ्या आईने ही जमीन विकण्यास काढल्याचे मला समजल्यानंतर मी या मिळकतीमध्ये हिस्सा मिळणेकामी पारनेर येथील दिवाणी न्यायालयात रे. मु. नं. ५००/२०२२ हा दावा दाखल केला आहे.

या दाव्याचा निर्णय अद्याप लागलेला नाही. हा दावा दाखल असल्याने माझ्या आईच्या नावावर असणारी जमीन विकत घेण्यास कोणीही पुढे आले नाही. मात्र, आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानचा पारनेर तालुकाध्यक्ष म्हणवून घेणारा व पारनेर बाजार समितीचा उपसभापती भाऊसाहेब ऊर्फ अंजाबापू सखाराम शिर्के हा कर्जुले हर्या ग्रामपंचायत सदस्य असून तो आडदांड व नंगड प्रवृत्तीचा आहे. आमच्या आईला हाताशी धरत त्याने माझ्या वडिलांसह संपूर्ण कुटुंबाला अंधारात ठेवून या जमिनीचा वाद न्यायालयात असल्याचे माहिती असूनही अधिकार्‍यांना हाताशी धरले.

मनगट शाही आणि आमदार लंके यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगत त्याने ही जमीन अनाधिकाराने खरेदी केली. गट नंबर ८५६/२ पैकी ० हे. २८ आर व खरांबा हे. ०८ आर तसेच गट नंबर १११९/१ पैकी ० हे. २२ आर व खराबा १ हे. ९० आर क्षेत्र हे सौ. पुष्पा संतोष उंडे यांनी त्यांचे नावे असल्याचा गैरफायदा घेऊन भाऊसाहेब सखाराम शिर्के यांना रजिस्टर खरेदीखत दस्त क्र.७८८९/२०२३ अन्वये दिनांक ०९/११/२०२३ रोजी पन्नास लाख रुपये किंमतीस कायमस्वरुपी विक्री केले आहे.

वास्तविक पाहता, या मिळकतींमध्ये आजपावेतो सरस निरस मानाने दिशा दर्शक वाटप विभाजन झालेले नसतांना, तसेच या मिळकतींबाबत पारनेर दिवाणी न्यायालयात रे.मु.नं. ५००/२०२२ हा दावा न्यायप्रविष्ट असतांना या मिळकतींबाबत झालेले खरेदीखत पूर्णपणे बोगस, बेकायदेशीर व पोकळीस्त स्वरुपाचे आहे. या मिळकतींचे सरस निरस मानाने वाटप विभाजन करुन मिळणेकामी तसेच मनाई हुकूम व इतर तदनुषंगीक बाबींकरीता मी पारनेर येथील दिवाणी न्यायालयात रे.मु.नं. ५००/२०२२ हा दावा दाखल केलेला आहे.

या दाव्याचे कामकाज मे. कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. कर्जुले हर्या, ता. पारनेर येथील गट नं. ८५६/२, १११९/१ या मिळकतीचे ७/१२ उतार्‍यावर खरेदीखत दस्त क्रमांक ७७८९/२०२३ नुसार फेरफार क्र. ४४८२ ची नोंद न होणेबाबत मी कामगार तलाठी, कर्जुले हर्या व पारनेर तहसीलदार यांच्याकडे दि. २१ नोव्हेंबर २०२३ रोजी हरकत अर्ज दाखल केलेला आहे. तसेच पारनेर न्यायालयात हे खरेदीखत रद्द करणेबाबत दावा दाखल केलेला आहे.

बाजार समितीमधील पदावर येणार गंडांतर!
आ. नीलेश लंके यांच्या प्रतिष्ठानचा तालुकाध्यक्ष म्हणून बापू शिर्के याने काही काळ काम पाहिले. दोन वर्षापूर्वी कल्याण हायवेवर एका सराफाचा चारचाकी वाहन अंगावर घालून निर्दयीपणे खून करण्यात आला होता. त्यातील आरोपी हा बापू शिर्के याचा सख्खा भाऊच निघाला. पारनेर बाजार समिती निवडणुकीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल मतदार संघातून निवडून आल्यानंतर सध्या तो उपसभापती म्हणून काम पाहत आहे. पन्नास लाखांना ही खरेदी केली असल्याचे त्याने खरेदीखतात दाखवले आहे. यातील दहा लाख रूपये त्याने खरेदी देणार्‍यास बिनदस्त इसार म्हणून दिले. तसा खरेदीखतात उल्लेख आहे. आर्थिक दुर्बल मतदारसंघातून उमेदवारी करण्यासाठी तहसीलदारांनी त्यास एक लाखाच्या आतील वार्षिक उत्पन्नाचा दाखला दिला आहे. वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असताना जमिन खरेदीसाठी पन्नास लाखांचा व्यवहार, त्यासाठी अडीच लाखाची स्टँप ड्युटी व तीस हजारांचे नोंदणी शुल्कही त्याने भरले आहे. याचाच अर्थ त्याने तहसीलदारांकडून मिळवलेला एक लाखांच्या आतील वार्षिक उत्पन्नाचा दाखला बनावट निघाला असल्याने आता त्याचे बाजार समितीमधील पद देखील धोक्यात येणार आहे.

कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी!
आ. नीलेश लंके यांचा कार्यकर्ता म्हणवून मिरवणारा जमिनीचा खरेदीदार हा तलाठी, सर्कल आणि तहसीलदार यांच्यावर दबाव आणत आहे. तसेच कोणी आडवे आले तर त्याला संपवून टाकील, अशी धमकी देत आहे. पिंपळगाव रोठा, पारनेर येथील माझ्या घरी रात्री – अपरात्री दुचाकीवरुन आलेल्या काही तरुणांकडून गेल्या दहा-बारा दिवसात सहा-सात वेळा दगडफेकही करण्यात आली. बापू शिर्के याच्या नादाला लागू नका. तो नीलेश लंके यांचा उजवा हात आहे. तुझ्या आईने जमीन विकली आहे. तुमचा कोर्टातील दावा मागे घ्या आणि बापूच्या (भाऊसाहेब शिर्के) नादी लागू नका, तो तुमच्या सर्व कुटुंबाला संपवून टाकील, असा निरोपही मला हस्ते-परहस्ते येऊ लागले आहेत. माझ्या घरावर गेल्या सात-आठ दिवसात होणार्‍या दगडफेकीमागे हाच बापू शिर्के असल्याची माझी खात्री पटत असल्याचे या निवेदनात सौ. डावखर यांनी म्हटले आहे.

महसुलमंत्री विखे पाटलांनाही घातले साकडे!
न्यायालयात वाद चालू असताना अधिकार्‍यांना हाताशी धरुन करण्यात आलेले हे खरेदीखत रद्द करण्याची मागणी करतानाच या प्रकरणी बापू शिर्के यास मदत करणार्‍या अधिकार्‍यांसह तहसीलदार, मंडलाधिकारी व तलाठी आणि स्वत: खरेदीदार शिर्के याच्यावर कारवाई करण्याची मागणी सौ. डावखर यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडे केली आहे. यात न्याय मिळाला नाही तर दालनात उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“पवार साहेब हो बोलले नंतरच राजकीय भूमिका…”; अजित पवार यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

Politics News: राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली...

जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आडकला जाळ्यात; नेमकं प्रकरण काय?

अहमदनगर । नगर सहयाद्री बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील एका कंत्राटी कर्मचार्‍याला...

बाप-लेकाच्या नात्याचा भयानक शेवट! जन्मदात्या मुलाने बापाला एका क्षणात संपवलं..

Ahmednagar Crime: कटूंबामध्ये वाद होणं ही काही नवीन बाब नाही. परिवारात किरकोळ कारणावरून नेहमीच...

ठरलं! अजित पवार कुठून निवडणूक लढवणार? प्रफुल्ल पटेल यांनी केली घोषणा..  

Maharashtra Politics News: महायुतीने महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. महायुतीच्या 235 उमेदवारांची पहिली...