शिर्डी। नगर सहयाद्री-
वजन कमी करण्यासाठी आतोनात प्रयत्न करत होती. पण कुठल्याही प्रकारे यश येत नव्हते. अखेर त्याचे कारण समोर आले तेव्हा तो एक धक्काच होता. या वाढत्या वजनाचे कारण होते, तिच्या पोटातील तब्बल साडेपाच किलो वजनाचा गोळा. हा मोठा गोळा बाहेर काढण्याचे ऑपरेशन यशस्वी झाले आहे.
परभणी येथून आलेल्या ४५ वर्षीय महिलेच्या पोटातून साडेपाच किलो वजनाचा गोळा काढण्याची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉ. राम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली साईबाबा संस्थानच्या दवाखान्यामध्ये डॉ. निर्मला गाडेकर यांनी पार पडली आहे.
महिलेचे दोन सिझेरियन ऑपरेशन झालेले होते. तिला गंभीर पोटदुखी, दम लागणे, पोटाचा आकार बाढून जड वाटू लागणे या सारखी लक्षणे जाणवत होती.
साडेपाच किलो बजनाचा पोटात असलेला गोळा यामुळे त्या महिलेची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून रुग्णाची सर्व वेदनांपासून कायमस्वरूपी मुक्तता झाली आहे.