spot_img
अहमदनगरधक्कादायक! विवाहितेवर बापसह लेकाचा अत्याचार; पुढे घडला भयानक प्रकार

धक्कादायक! विवाहितेवर बापसह लेकाचा अत्याचार; पुढे घडला भयानक प्रकार

spot_img

अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी ः गुन्हा दाखल
अहमदनगर | नगर सह्याद्री
अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडितेने घडलेला प्रकार अत्याचार करणार्‍या तरूणाच्या वडिलाला सांगितला असता त्याने देखील पीडितेसोबत गैरवर्तन केले. या प्रकरणी पुणे येथे राहणार्‍या पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश रावसाहेब धरम, त्याचे वडिल रावसाहेब माधव धरम (दोघे रा. मोहिनीनगर, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी विवाहिता कुटुंबासह पुणे येथे राहतात. त्यांच्यावर ३० नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे अडीच वाजता गणेश धरम याने त्याच्या राहत्या घरी अत्याचार केला. त्यानंतर त्याने त्याची बहिण प्रियंका वीर (एमआयडीसी, नगर) हिच्या घरी, पुण्यातील फिर्यादीच्या घरी व पुण्यातीलच दोन लॉजवर ४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वेळोळेळी अत्याचार केला. गणेश याने फिर्यादीसोबत काढलेले अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, घरच्यांना व फिर्यादीला कायमचे संपवून टाकण्याचा धमकी देऊन अत्याचार केला. तसेच फिर्यादीकडील सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतले.

घडलेला प्रकार फिर्यादीने गणेशचे वडील रावसाहेब याला सांगितला. त्याने देखील फिर्यादीसोबत गैरवर्तन करून, ‘माझ्या मुलाचे नाव मला सांगते, माझेही नाव सगळ्यांना सांग’, असे म्हणून गैरवर्तन केले. ‘हिला बिनधास्त वापर, कोण काय करतो बघून घेऊ, तुझा बाप आहे ना, काय कोणाला घाबरतो, काय होईल ते पाहून घेतो, घाबरू नको’, असे गणेश याला म्हणून झाल्या प्रकराबाबत रागवण्याऐवजी किंवा समजावून सांगण्याऐवजी प्रोत्साहन दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.दरम्यान पीडितेने या प्रकरणी सोमवारी (दि. ५) कोतवाली पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी गणेश धरम व त्याचे वडिल रावसाहेब धरम विरोधात अत्याचार, खंडणी, विनयभंग, मारहाण, शिवीगाळ, दमदाटी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर हादरलं! ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार’, नराधमाने शेतात नेलं अन्..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रेम विजय...

गणेशभक्तांना दिलासा! विधिमंडळात मोठी घोषणा; वाचा एका क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य उत्सव म्हणून...

नगरात खळबळजनक प्रकार! टी-शर्टला धरून उचलले, डोक्याला लावला कट्टा अन्..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गणेशवाडी, स्वस्तिक चौक येथील व्यापारी हिमेश दिलीप पोरवाल (वय 31)...

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील ‘तो’ शापित ‘युटर्न’; एकाच जागेवर गेले अकरा जीव..

पारनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पारनेरमधील जातेगाव फाट्यावरील एका युटर्नवर सागर सुरेश धस...