spot_img
अहमदनगरअहमदनगर : वाहन पार्किंगच्या कारणावरून डोक्याला लावली पिस्तूल, त्यानंतर...

अहमदनगर : वाहन पार्किंगच्या कारणावरून डोक्याला लावली पिस्तूल, त्यानंतर…

spot_img

कोठला येथील प्रकार | पितापुत्राला रॉडने मारहाण
अहमदनगर | नगर सह्याद्री – 
वाहन पार्किंगच्या कारणातून तरूणाच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावून धमकावत रॉडने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी (दि. १४) दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास कोठला परिसरात ही घटना घडली. इम्रान मुन्नार शेख (वय ३५ रा. मुकुंदनगर) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

उपचारादरम्यान त्याने तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून आठ ते नऊ जणांविरोधात खुनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. इम्रान चमेली, सरवर ऊर्फ भिम्या (दोघे रा. झेंडीगेट), जुबेर म्हैसावाला, एजाज चिच्ची (दोघे रा. मुकुंदनगर) व इतर चार ते पाच अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. इम्रान शेख व त्यांचे वडील कोठला येथील त्यांच्या मुन्नार मोटार गॅरेजमध्ये जेवण करीत असताना दोन चारचाकी वाहने गॅरेजसमोर येऊन उभा राहिली. त्यातील सर्वजण उतरून गुलशन हॉटेल येथे जेवण्यासाठी जात असताना दिसले.

तेव्हा इम्रान शेख व त्यांच्या वडिलांनी त्या वाहनातून उतरलेल्या व्यक्तींना, हॉटेलमध्ये जेवण करण्यास चालले तर वाहने तेथे पार्क करा, असे सांगितले असता त्यांना त्याचा राग आला. रागातून सरवर ऊर्फ भिम्या व एजाज चिच्ची यांनी इम्रान शेख यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जुबेर म्हैसावाला याने रॉडने डोयात मारून गंभीर जखमी केले. इम्रान चमेली याने कमरेला लावलेले रिव्हॉल्वर काढून जिवे मारण्याच्या उद्देशाने डोयाला लावून लोड करत असताना इम्रान यांनी त्याच्या हाताला झटका मारून तेथून पळ काढला. गंभीर जखमी इम्रान यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मंत्री विखे शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी, दिले महत्वाचे आदेश..

पाथर्डी | नगर सह्याद्री सोमवारी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागात अतिवृष्टी...

आयत्या पिठावर रेघोट्या मारून, खोटे सांगून क्रेडिट का घेता?; माजी मंत्री थोरात यांचा विरोधकांना सवाल

संगमनेर | नगर सह्याद्री दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता सहकारमहष भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या...

जीएसटी समितीच्या अहिल्यानगर शहर संयोजकपदी निखिल वारे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय सर्वसामान्यांसाठी लाभकारक आहे. पंतप्रधान...

महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 40 जणांचा आक्षेप, वाचा, सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्यासाठी दिलेल्या अंतिम दिवसापर्यंत (15...