spot_img
ब्रेकिंगPolitician News:काँग्रेसला धक्का!! ५५ वर्षांचे जुने नाते संपवत 'यांचा' शिवसेनेत प्रवेश

Politician News:काँग्रेसला धक्का!! ५५ वर्षांचे जुने नाते संपवत ‘यांचा’ शिवसेनेत प्रवेश

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
मी काँग्रेस सोडेन असे कधीच वाटले नव्हते. आज माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी ५५ वर्षाचे जुने नाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली संपवत आहे, असे मिलिंद देवरा यांनी म्हटले. मुख्यंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत काँग्रेसमधील सहकार्‍यांसह प्रवेश केला.

ते म्हणाले, माझे राजकारण सकारात्मक, रचनात्मक, विकासात्मक राहिले आहे. माझी विचारधारा सर्वसामान्य लोकांची सेवा करणे हे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे अत्यंत मेहनती, सगळ्यांसाठी उपलब्ध आणि जमिनीवरचे नेते आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांचे ध्येय मोठे आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडे व्हिजन आहे. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचे हात बळकट करायचे आहेत. माझे शिवसेनेशी नाते जुने आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं माझे वडील मुरली देवरा महापौर बनले होते. राजकारणात जनसेवा आणि लोकसेवा एक विचारधारा आहे. १९६८ ची काँग्रेस, २००८ ची काँग्रेस आणि आजच्या काँग्रेसमध्ये अंतर आहे. काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सकारात्मक सूचनांना प्रतिसाद दिला असता तर मला हा निर्णय घ्यावा लागला नसता.

देवरा म्हणाले, काँग्रेस आज उद्योगपतींना देशविरोधी म्हणत आहे. मोदीजी जे सांगतात त्याच्या ते विरोधात असतात. केंद्रात आणि राज्यात मजबूत सरकारची आवश्यकता आहे. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे चांगलं काम करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...