अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरात सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात रविवार, दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता ‘शिवशक्ती-भीमशक्ती जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगताप, हिंदुत्वादी नेते सागर बेग, तसेच ॲड. वाल्मीक निकाळजे हे प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होणार असून नगरकरांना संबोधीत करणार आहे.
मोर्चाचा मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पंचपीर चावडी येथून सुरू होणार असून सर सेनापती तात्या टोपे चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (माळीवाडा), तख्ती दरवाजा, माणिक चौक, कापड बाजार, तेलीखुंट चौक, चितळे रोड, चौपाटी, कारंजा मार्ग असा असून दिल्लीगेट येथे सांगता सभा होणार आहे.
सोमवार, दिनांक 06 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता इम्पेरियल चौकातील उड्डाणपुलावरून एका व्यक्तीने दोन प्लॅस्टिकच्या पिशव्या रिक्षा स्टॉपजवळ फेकल्या. या पिशव्यांमध्ये अंडी आणि काही कागदांचे तुकडे आढळून आले. या कागदांवर समाजात तेढ निर्माण करणारा आणि महापुरुषांचा अवमान करणारा मजकूर लिहिलेला होता. या प्रकारामुळे शहरात मोठा संताप निर्माण झाला होता.