spot_img
अहमदनगरभिंगार शहरात कडकडीत बंद; आंबेडकरी समाजाच्यावतीने मोठी मागणी

भिंगार शहरात कडकडीत बंद; आंबेडकरी समाजाच्यावतीने मोठी मागणी

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री
नगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाणपुलावरून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह पत्रके फेकल्याच्या घटनेच्या निषेधार्थ तसेच या घटनेेतील मुख्य सुत्रधारास अटक करण्याच्या मागणीसाठी आंबेडकरी समाजाच्यावतीने शनिवारी भिंगार शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापारी तसेच भिंगार शहरवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी भिंगार कॅम्प पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

भिंगार येथील व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे भिंगार शहरातील नेहमी गर्दीने गजबजलेले रस्ते आज ओस पडले होते.
नगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील उड्डाणपुलावरून काही अज्ञात व्यक्तींनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह पत्रके फेकल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आंबेडकरी समाजाच्यावतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करून 24 तासाच्या आत एका आरोपीला अटक केली. आंबेडकरी समाजाच्यावतीने मुख्य सुत्रधारास अटक करण्याची मागणी करण्यात आली असून सदर घटनेच्या निषेधार्थ आज भिंगार शहरात बंद पाळण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटात धनंजय मुंडेंच्या समर्थकाला अटक, तिसऱ्याला रात्री उशिरा उचलला

जालना । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट...

शेतकर्‍यांना खुशखबर मिळणार! केंद्र सरकार आज मोठी घोषणा करणार?

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी २१व्या हप्त्याची खूप दिवसांपासून वाट...

आजचे राशी भविष्य ! आजचा दिवस कुणासाठी आहे खास?, कुणाला मिळणार यश? जाणून घ्या…

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या....

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...