spot_img
अहमदनगररविवारी अहिल्यानगर शहरात शिवशक्ती-भीमशक्तीचा जनआक्रोश मोर्चा

रविवारी अहिल्यानगर शहरात शिवशक्ती-भीमशक्तीचा जनआक्रोश मोर्चा

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरात सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात रविवार, दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता ‌‘शिवशक्ती-भीमशक्ती जनआक्रोश मोर्चा‌’चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगताप, हिंदुत्वादी नेते सागर बेग, तसेच ॲड. वाल्मीक निकाळजे हे प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होणार असून नगरकरांना संबोधीत करणार आहे.

मोर्चाचा मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पंचपीर चावडी येथून सुरू होणार असून सर सेनापती तात्या टोपे चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (माळीवाडा), तख्ती दरवाजा, माणिक चौक, कापड बाजार, तेलीखुंट चौक, चितळे रोड, चौपाटी, कारंजा मार्ग असा असून दिल्लीगेट येथे सांगता सभा होणार आहे.

सोमवार, दिनांक 06 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता इम्पेरियल चौकातील उड्डाणपुलावरून एका व्यक्तीने दोन प्लॅस्टिकच्या पिशव्या रिक्षा स्टॉपजवळ फेकल्या. या पिशव्यांमध्ये अंडी आणि काही कागदांचे तुकडे आढळून आले. या कागदांवर समाजात तेढ निर्माण करणारा आणि महापुरुषांचा अवमान करणारा मजकूर लिहिलेला होता. या प्रकारामुळे शहरात मोठा संताप निर्माण झाला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटात धनंजय मुंडेंच्या समर्थकाला अटक, तिसऱ्याला रात्री उशिरा उचलला

जालना । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट...

शेतकर्‍यांना खुशखबर मिळणार! केंद्र सरकार आज मोठी घोषणा करणार?

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी २१व्या हप्त्याची खूप दिवसांपासून वाट...

आजचे राशी भविष्य ! आजचा दिवस कुणासाठी आहे खास?, कुणाला मिळणार यश? जाणून घ्या…

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या....

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...