सुपा। नगर सह्याद्री
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचे आमरण उपोषण सुरू आहे. मराठा आंदोलनाला अनेक जाती-धर्माच्या लोकांनी पाठींबा दिला असून सध्या गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. सरकारने त्यांना ३० दिवसांची मुदत दिली होती, पण सरकार शब्दाला जागले नाही. त्यानंतर ४० व्या दिवशी जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरू केले. आणि त्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे.
जरांगे पाटील यांनी समाजासाठी अन्न,पाण्याचा त्याग केला आहे, त्यांची प्रकृती सध्या खूप खालावली आहे. त्यांची हाक सरकारला समजावी, त्यांच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्या आणि त्यांच्या आरोग्यासाठी चित्रपट सृष्टीही पुढे सरसावली आहे. सिने अभिनेत्री अश्विनी इरोळे यांनी ३१ ऑक्टोबर रोजीशिवनेरी गडावर शिवाई देवीचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालून, महाआरती करून जरांगे पाटलांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.
यावेळीअश्वयुग महिला मंचच्या सदस्या सुरेखा पोटघन, सोनिया चौधरी, रोहिणी वाळके, स्वाती शेळके, कविता जर्हाड, जयश्री नवले तसेच मच्छिंद्र रसाळ, गौरव म्हस्के,भरत घावटे, लेखक, दिग्दर्शक भाऊसाहेब इरोळे, सोमनाथ शेळके, सादिक शेख असे अनेक जाती-धर्माच्या लोकांनी उपस्थित राहून मनोज जरांगे पाटलांच्या आरोग्यासाठी सार्वजनिक महाआरती आणि प्रार्थना केली प्रार्थना करताना सर्वच जण भावूक झाले.