spot_img
अहमदनगरलेखापरीक्षक पॅनेलवर सीए सभासदांनी नोंदणी करावी : काळे

लेखापरीक्षक पॅनेलवर सीए सभासदांनी नोंदणी करावी : काळे

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था, सहकारी बॅंका, विविध कार्यकारी सोसायटी आदींचे शासकीय लेखापरीक्षण करण्यासाठी सहकार खाते लेखापरीक्षकांचे नवीन पॅनल तयार करणार आहे. त्यासाठी २३ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहेत. या पॅनेलवर जास्तीत जास्त सीए सभासदांनी नोंदणी करावी असे आवाहन सीए नगर शाखेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे यांनी केले आहे.

सीए नगर शाखेतर्फे सहकार लेखापरीक्षण पॅनेल मार्गदर्शन चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार खात्याचे विशेष लेखापरीक्षक एन ए ठोंबरे व सीए घनश्याम सोळंकी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी काळे म्हणाले की, २०१६ साली शेवटचे सहकार पॅनेल तयार झाले होते.

त्यानंतर कोरोनामुळे २०१९ पासून सदर पॅनेलला मुदतवाढ मिळत गेली. परिणामी मागील ६ वर्षात नवीन सीए पास झालेल्या सभासदांना सहकार क्षेत्रातील बँका, पतसंस्था, विविध कार्यकारी सोसायटी यांचे शासकीय लेखापरीक्षण करता येत नव्हते. त्यामुळे आता सहकार क्षेत्रात लेखापरीक्षण करण्याकरिता सीए साठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे त्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही काळे यांनी केले.

यावेळी विशेष लेखापरीक्षक ठोंबरे यांनी सहकार क्षेत्रात काम करताना काय काळजी घ्यावी, कुठले कागदपत्र महत्वाचे असतात, लेखापरीक्षण अहवाल कसा तयार करावा यासंदर्भात मार्गदर्शन केले. सीए घनश्याम सोळंकी यांनी सहकार खात्याच्या वेबसाईटवर अर्ज कसा दाखल करावा, कुठले कागदपत्र अपलोड करावे लागतात याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खजिनदार अभय कटारिया यांनी तर उपाध्यक्ष सनित मुथा यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीततेसाठी सचिव प्रसाद पुराणिक, कमिटी सदस्य महेश तिवारी, पवन दरक आदींनी परिश्रम घेतले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर; राष्ट्रवादी पक्षाकडून एबी फॉर्म प्राप्त

राणीताई निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर; राष्ट्रवादी पक्षाकडून एबी फॉर्म प्राप्त महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर...

राणीताई लंके यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब?; महायुतीत एकमत होईना

तिरंगी-चौरंगी लढतीची शक्यता गणेश जगदाळे | नगर सह्याद्री विधानसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहे. पारनेर...

पवारांच्या नातवाकडून कर्जत-जामखेडकरांचा भ्रमनिरास; रोहित पवारांविरोधात तरुणाई देखील एकवटली

साधा माणूस म्हणून राम शिंदेंचा मार्ग झाला अधिक सुकर कर्जत | नगर सह्याद्री पवारांचा नातू म्हणून...

जागावाटपाआधीच आघाडीत बिघाडी; काँग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीचा अर्ज…

मुंबई / नगर सह्याद्री - महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे सूत्र अद्याप जाहीर झालेले नाही. कोणती...