spot_img
महाराष्ट्र"जरांगेंची स्क्रीप्ट लिहून येतेय का?"; नितेश राणेंचे 'हे' खळबळजनक वक्तव्य, जरांगे पाटलांनी...

“जरांगेंची स्क्रीप्ट लिहून येतेय का?”; नितेश राणेंचे ‘हे’ खळबळजनक वक्तव्य, जरांगे पाटलांनी दिले ‘हे’ प्रतिउत्तर

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या काही दिवसांपासून राज्यभर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. मंत्रालयाजवळील आमदार निवासस्थानाजवळ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या.

या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसात्मक घटनांशी संबंधितांवर कारवाई करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुन, जरांगे पाटील यांनी टीका केली. आता, जरांगे पाटील यांच्या टीकेनंतर भाजपा आमदार नितेश राणेंनी जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहे. जरांगे पाटील यांनीही पलटवार केला आहे.

आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्यांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक इशारा दिला आहे. शांततापूर्ण आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यांचे ऐकले जाईल. मात्र, हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही असं गृहमंत्र्यांनी बजावलं आहे. गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनीही टीका केली. मोदींवरही त्यांनी हल्ला चढवला. भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवरून पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

काय म्हणाले नितेश राणे?
पहिल्या दिवसापासून शांततेची भाषा करणारे जरांगे पाटील आता राजकीय बोलू लागले आहेत. ज्या समाजकंटकांनी हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला, लोकांची घरं जाळली, आमदारांची घरं पेटवली, तोडफोडो केली त्यांच्याविरोधात गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कडक भूमिका घेतली. त्या भूमिकेचं समर्थन करण्यापेक्षा जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. याचा असा अर्थ होतो का, जरांगे पाटील या हिंसेचं समर्थन करत आहेत, त्यांची स्क्रीप्ट कोठून तरी लिहून येत आहे? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी विचारला. आणि असं होत असेल तर राज्य सरकार म्हणून याबाबत आम्हाला विचार करावाच लागेल, असही सुनावलय.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?
“आता राणे साहेबांनी बोलू नये अशी माझी इच्छा आहे. काल माझ्याशी फोन करुन गोडगोड बोलतात. पण आता याच्यापुढे बोलू नका,” असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. यानंतर प्रसाद लाड यांनी तुमचा बोलवता धनी कोण आहे असा प्रश्न विचारल्याचं पत्रकाराने सांगितलं. यावर संतापलेल्या स्वरात जरांगे पाटलांनी, “त्याला भेटल्यावर सांगतो मी बोलवता धनी कोण आहे आणि काय आहे,” असं उत्तर दिलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा; वादग्रस्त मोहोळ विरुद्ध राक्षे लढतीची चौकशी होणार

योगेश दोडके यांची माहिती / प्रा.विलास कथुरे यांची प्रमुखपदी नियुक्ती अहिल्यानगर / नगर सह्याद्री : अहिल्यानगरमध्ये...

तब्बल १९ बोगस कंपन्यांमधून कोट्यवधी लुटले; मोबाईल चालू तरी पोलिसांना सापडेना संदीप अन् त्याची टोळी…

 पोलीस अधिकार्‍यांच्या भूमिकाच संशयास्पद स्पेशल रिपोर्ट / शिवाजी शिर्के - सह्याद्री मल्टीनिधी ही कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत...

शनिशिंगणापूर देवस्थानचा मोठा निर्णय; शनिदेवाला ब्रँडेड तेलानेच करावा लागेल अभिषेक!

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एक मार्च २०२५ पासून...

‘सुपा, पारनेर, बेलवंडीत दरोडा टाकणारे जेरबंद’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- सुपा, पारनेर, बेलवंडीत परिसरात घरफोडी करणारे अट्टल दरोडेखोरांना, स्थानिक गुन्हे...