spot_img
अहमदनगरAhmadnagar: 'शिवसेना शहरप्रमुखा विरोधात व्यापारी आक्रमक' कामगारांवर उपासमारीची वेळ, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार,...

Ahmadnagar: ‘शिवसेना शहरप्रमुखा विरोधात व्यापारी आक्रमक’ कामगारांवर उपासमारीची वेळ, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार, नेमकं प्रकरण काय?

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री-

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटच्या आवारात १९९७ सालापासून २५ ते ३० व्यापारी फुलाचा व्यवसाय करतात. शेतकरी मोठ्या संख्येने विविध प्रकारचे फुलं येथे विक्रीसाठी आणतात. शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी फुल विक्रेत्यांच्या गाळ्यांविरोधात अर्ज करून गाळे पाडण्यासाठी पाठपुरावा सुरु केला आहे. त्यामुळे व्यापारी व कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येईल असा आरोप करत फुल विक्रेते सातपुतेंविरोधात आक्रमक झाले असून ते याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा व्यापार्‍यांनी दिला.

मार्केट यार्डमध्ये फुलविक्रेत्यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव, बापूसाहेब जासूद, अजय गारदे, वसंत आगरकर, संतोष गोंधळे, दिलीप आसमर, मुश्ताक सय्यद, लियाकत सय्यद, नसीम खान, सचिन मेहेत्रे, रशीद खान, अयाज शेख, अनिकेत आगरकर, सूरज कोके, शब्बीर सय्यद, राहुल शेरकर, बाबासाहेब ठोकळ, किरण जाधव, मछिंद्र कातोरे, कैलास धाडगे, अजय तिवारी, प्रकाश आगरकर आदी उपस्थित होते.

यावेळी व्यापार्‍यांनी म्हटले आहे की, कोविडमुळे ३ वर्षांपासून फुलविक्रेते आर्थिक संकटात सापडले आहेत. फुलांना योग्य भाव मिळत नव्हते. त्यातच फुल विक्रेत्यांचे गाळे पाडण्याचा निर्णय झाला. आमची रोजीरोटी बंद करून आमच्यावर अन्याय का करता? तुमच्या दुश्मनीसाठी आमचा बळी का देता? असा सवाल व्यापार्‍यांनी केला. जर तुम्ही आमच्या व्यवसाय व घरापर्यत येत असाल तर आम्ही रस्त्यावर उतरू. लवकरच फुलविक्रेत्यांची कमिटी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटात धनंजय मुंडेंच्या समर्थकाला अटक, तिसऱ्याला रात्री उशिरा उचलला

जालना । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट...

शेतकर्‍यांना खुशखबर मिळणार! केंद्र सरकार आज मोठी घोषणा करणार?

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी २१व्या हप्त्याची खूप दिवसांपासून वाट...

आजचे राशी भविष्य ! आजचा दिवस कुणासाठी आहे खास?, कुणाला मिळणार यश? जाणून घ्या…

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या....

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...