spot_img
महाराष्ट्रमाझी नार्को टेस्ट करा, दारूला स्पर्शही केलेला नाही.. मनोज जरांगेंचं भुजबळांना ओपन...

माझी नार्को टेस्ट करा, दारूला स्पर्शही केलेला नाही.. मनोज जरांगेंचं भुजबळांना ओपन चॅलेंज

spot_img

जालना / नगरसह्याद्री : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यात वाद सुरूच आहे. परंतु आता हा वाद एकमेकांवर वैयक्तिक आयुष्यावरील आगपाखडवर येऊन ठेपला आहे.

सतत दारू पिऊन मनोज जरांगेंच्या किडन्या खराब झाल्याचा आरोप ओबीसी एल्गार मेळाव्यातून छगन भुजबळांनी केला होता. या आरोपाला आज मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी याआधीच भुजबळांना चॅलेंज दिलं होतं. आज पुन्हा हे चॅलेंज देतो. मी जन्मल्यापासून आजपर्यंत एकदाही दारू प्यायलेली नाही.

माझी नार्को टेस्ट करा. शरीरात दारूचा एक थेंबही आढळला तर मी जिवंत समाधी घ्यायला तयार आहे. पण दारू न आढळल्यास भुजबळांनी समाधी घ्यावी, असं आव्हान जरांगे पाटलांनी दिलं आहे. गिरीश महाजन यांनी सांगितल्यामुळे मागील दोन दिवसांपासून आम्ही भुजबळ यांच्याबद्दल एकही शब्द काढत नव्हतो. पण त्यांनी काल पुन्हा माझ्यावर टीका केली.

ते बोलल्यावर मी शांत कसा बसणार? ते आता बधीर झाले असून त्यांना गोळ्या सुरू करण्याची गरज आहे, असा हल्लाबोल मनोज जरांगे यांनी केला. भिवंडी येथे छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत काल ओबीसी एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगे पाटील यांच्या मागणीचा समाचार घेत जोरदार टीकास्त्र सोडलं होतं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....