शिवसेना शिंदे गटाची पारनेर मध्ये लवकरच बैठक; युवासेना तालुकाप्रमुख सुभाष सासवडे यांची माहिती
पारनेर/ नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यात विधानसभा निवडणूकीमध्ये पुलाखालून बरेच पाणी गेले. अनेकांनी पक्षप्रवेश केले शिवसेना शिंदे गटाचे पारनेर तालुका प्रमुख विकास उर्फ बंडू रोहोकले यांनी राष्ट्रवादीत शक्ती प्रदर्शन करत भाळवणी येथे मोठा कार्यक्रम घेऊन प्रवेश केला त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला आता पारनेर तालुक्यात तालुकाप्रमुखच नाही शिंदे शिवसेनेची पारनेर तालुक्यात आता नेतृत्व कोण करणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुकाप्रमुख पदासाठी वेगवेगळी नावे समोर येत आहेत परंतु अजून त्यावर वरिष्ठ लेवल वरून एक मत होताना दिसत नाही शिवसेना पक्ष पारनेर तालुक्यात वाढवण्यासाठी व तळागाळात पोचवण्यासाठी तसेच हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार सर्वसामान्य पर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसेना शिंदे गटाला आता तालुक्यात नेतृत्वाची गरज आहे लवकरच शिवसेना शिंदे गटाचा पारनेर येथे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन नवीन कार्यकारणी व नवीन पदाधिकारी नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समितीचे सदस्य सुभाष सासवडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
पारनेर तालुका हा शिवसेना विचारांचा तालुका आहे. पारनेर मध्ये शिवसेनेचा सलग पंधरा वर्ष आमदार राहिलेला असून हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही तळागाळात पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून लवकरच शिंदे गटाची तालुक्यात नवीन कार्यकारणी वरिष्ठांच्या आदेशाने तयार करून पुन्हा त्याच ताकतीने गावोगावी शिवसेना वाढवणार आहे.
सुभाष सासवडे (तालुकाप्रमुख युवासेना शिंदे गट)