spot_img
अहमदनगरशरद पवार यांच्या पक्षाचे परिवर्तनाचे आवाहन म्हणजे मतदारांची दिशाभुल, दहा जागा लढविणारी...

शरद पवार यांच्या पक्षाचे परिवर्तनाचे आवाहन म्हणजे मतदारांची दिशाभुल, दहा जागा लढविणारी तुतारी परिवर्तन कसे करणार?; भाजप नेत्याचा सवाल

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री –
लोकसभेत बहुमतासाठी किमान २७२ जागा आवश्यक असतात. संपुर्ण देशभरात केवळ १० जागा लढविणारया राष्ट्रवादी काँग्रेस (तुतारी) पक्षाचे ‘परिवर्तनाचे आवाहन’ म्हणजे मतदारांची दिशाभुल करण्याचा प्रकार आहे, असे मत भाजपाचे नेते विनायकराव देशमुख यांनी व्यक्त केले.

काल नगरच्या गांधी मैदानात महाविकास आघाडीची प्रचार सभा झाली. व्यासपीठावर महाविकास आघाडीचे ज्येष्ठ व अनुभवी नेते उपस्थित होते. त्यामध्ये १० जागा लढविणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) गटाचे , १८ जागा लढविणारया शिवसेना (उबाठा) चे व उत्तर महाराष्ट्रात केवळ एक जागा लढविणारया काॅन्ग्रेस पक्षाचे मोठे नेते उपस्थित होते.लोकसभेच्या एकुण ५४३ जागांपैकी बहुमतासाठी २७२ जागांची आवश्यकता असते, याची या मंडळींना संपुर्ण जाणीव असताना “देशात परिवर्तनासाठी आम्हाला निवडून द्या.”,असे आवाहन करुन त्यांनी एक प्रकारे मतदारांची दिशाभूलच केली आहे.

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस पक्ष २३० जागांवर तर तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी,आप ऄआयडिएमके असे अन्य प्रादेशिक पक्ष प्रत्येकी ३०/४० जागांवर निवडणूक लढवित असुन एकमेव भारतीय जनता पक्ष ४५० पेक्षा जास्त जागा लढवित आहे. त्यामुळे इंडि आघाडीतील पक्ष सत्तेवर येण्यासाठी नव्हे तर फक्त नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठीच निवडणूक लढवित असल्याचे स्पष्टपणे लक्षात येते.

एका बाजूला नरेंद्र मोदी यांच्या रुपाने कणखर व एकमुखी नेतृत्व तर दुसरीकडे ‘आपला समन्वयक ही ज्यांना लवकर निवडता आला नाही ” अशी विस्कळीत इंडि आघाडी,असे चित्र आहे. अशावेळी मतदारांनी प्रादेशिक पक्षांच्या भुलथापांना बळी न पडता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खंबीर नेतृत्वाला मतदान करावे, व पाच दहा जागा लढविणार या पक्षाला मतदान करुन आपले मत वाया घालवू नये,” असे आवाहन श्री.विनायकराव देशमुख यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डीवायएसपी बनून प्लॉटच्या नावावर रेल्वे पोलिसांना घातला मोठा गंडा; काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्वतःला निलंबित डीवायएसपी असल्याचे भासवून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अतिवृष्टी नुकसानीचे अनुदान खात्यावर वर्ग

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिवृष्टी आणि पूर यामुळे दिनांक ०१ जून ते सप्टेंबर २०२५ या...

मनपाची मनमानी थांबवा, त्यावर नागरिकांचा संताप, खासदार लंके म्हणाले…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर आकारणी प्रक्रियेतील अनियमितता, अस्पष्टता आणि नियमभंगाविरोधात...

मालमत्ताकरात मनपाकडून मोठे स्टेटमेंट; आयुक्त डांगे म्हणाले…

मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत कराच्या नाहीत / कर निर्धारित करण्यासाठी...