spot_img
अहमदनगरmp sujay vikhe patil : मोदी गॅरंटी म्हणजे १४० कोटी जनेतेचा समग्र...

mp sujay vikhe patil : मोदी गॅरंटी म्हणजे १४० कोटी जनेतेचा समग्र विकास : खा. सुजय विखे पाटील

spot_img

कर्जत । नगर सह्याद्री
mp sujay vikhe patil : भारताने अमृतकाळात प्रवेश केला असून मोदी पर्वात जगावर आपला ठसा उमटविला आहे. देशात सुरू असलेली मोदी गॅरंटी ही निवळ घोषणा नसून १४० कोटी जनतेच्या विकासाची हमी असल्याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या केवळ १० वर्षाच्या काळात विकसित देशाकडे वाटचाल केली चालू केली आहे. ११ व्या स्थानावर असेललेली अर्थव्यवस्था मोदीजींनी ५ व्या स्थानावर आणली. यामुळे मोदी गॅरंटी म्हणजे १४० कोटी जनतेच्या विकासाचा मुलंमत्र असल्याचेही खा. सुजय विखे म्हणाले. ते कर्जत येथिल कर्जत तालूक्यातील निमगाव येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार राम शिंदे यांच्या सह विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सुजय विखे म्हणाले की मोदी पर्वात सबका साथ, सबका विकास या भावनेतून अशा समाजाची निर्मिती केली, जिथे सर्वांना स्थान आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या माध्यमातून सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जिवंत ठेवला. मोदीजींनी समृध्द व सुरक्षित देशाचा संकल्प केला आहे. आणि तो मोदी गॅरंटीतून जपला जाणार आहे. आज संपुर्ण जगाला भारताच्या आर्थिक धोरणांवर विश्वास निर्माण झाला आहे.जगभरातून विविध गुंतवणुकीचा ओघ वाढत चालला आहे. यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. असे सुजय विखे म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....