spot_img
राजकारणपंकजांना तगडं आव्हान देण्यासाठी शरद पवारांची खेळी ! 'यांना' उमेदवारी देणार?

पंकजांना तगडं आव्हान देण्यासाठी शरद पवारांची खेळी ! ‘यांना’ उमेदवारी देणार?

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने दुसरी यादी जाहीर करत, महाराष्ट्रातील २० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यामध्ये, यंदा बीडमधून प्रीतम मुंडेंचं तिकीट कापण्यात आलं असून पंकजा मुंडेंना लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे, आता महाविकास आघाडीकडून बीडमधील उमेदवार कोण असणार, याची चर्चा निवडणुकांच्या राजकीय वर्तुळात होत आहे. त्या अनुषंगाने शरद पवार यांनी राजकीय डाव टाकल्याचं दिसून येत आहे. कारण, मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटेंना बीडच्या मैदानात उतरवण्याची चर्चा सुरू आहे.

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली असून अजित पवार यांचे खंदे समर्थक असल्याने धनंजय मुंडेंनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं. धनंजय मुडे अजित पवारांसोबत गेल्यामुळे, बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या उमेदवारीला बळ मिळालं आहे. स्वत: पंकजा मुंडेंनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडे आमच्यासोबत असल्याने आता अधिक मतांनी विजयी होऊ, असा विश्वास व्यक्त केला. मात्र, महाविकास आघाडीकडून ज्योती मेटे यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. विशेष म्हणजे ज्योती मेटे यांनी शरद पवारांची भेटही घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना पंकजा मुंडेंना महाविकास आघाडीकडून तगडा महिला उमेदवार मैदानात उतरवला जाण्याची शक्यता दिसून येते.

ज्योती मेटे ह्या शिवसंग्राम संघटेनेचे संस्थापक आणि मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षे लढा देणारे नेते विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत. विनायक मेटेंच्या अपघाती व अकाली निधनानंतर ज्योती मेटेंना विधानपरिषदेवर घेण्यात यावे, अशी मागणीही शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. ज्योती मेटेंनी शिवसंग्रामचं नेतृत्त्व करावं, अशी इच्छाही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली होती. डॉ. ज्योती मेटे या नाशिक येथे धर्मादाय कार्यालयात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. मेटे यांच्या निधनानंतर त्या सातत्याने कार्यकर्त्यांच्या संपर्कात असून त्यांना मार्गदर्शन करत आहेत. आता, त्यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बजरंग सोनवणेही महाविकास आघाडीत?
दरम्यान, गतवर्षी पंकजा मुंडेंविरुद्ध लोकसभा लढवणारे धनंजय मुंडेंचे खास असलेले येडेश्वरी शुगर्सचे सर्वेसर्वा बजरंग सोनवणे यांनीही शरद पवारांची भेट घेतली असून तेही महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याचे समजते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्ह्याच्या विकासासाठी…? खासदार विखेंची प्रचार सभेत मोठी ग्वाही, वाचा सविस्तर…

अहमदनगर | नगर सह्याद्री मागील पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून भरपुर निधी मिळाला...

गोवंशीयांची कत्तल करणारे तिघे जेरबंद! ‘असा’ सापळा लावत २० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अहमदनगर | नगर सह्याद्री बंदी असतानाही संगमनेर शहरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्री...

अहमदनगर: पाण्यासाठी पुढार्‍यांना गावबंदी! नगरच्या ‘या’ गावातील ग्रामस्थाचा मतदानावर बहिष्कार

अहमदनगर | नगर सह्याद्री एकीकडे लोकसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. प्रचारसभांनाही वेग आला आहे...

Pineapple: ‘अशा’ पद्धतीने करा अननसाची शेती, एका हेक्टरमध्ये 30 टन उत्पादन? वाचा सविस्तर

नगर सहयाद्री वेब टीम- आता शेतीतील काळ बदलण्याची गरज आहे. राज्यातील शेतकरी आता विविध नाविन्यपूर्ण...