spot_img
देशलोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, देशात सात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, देशात सात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका

spot_img

नवी दिल्ली / नगर सहयाद्री :
16 जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्या अनुशंघाने लोकसभेच्या निवडणुका आज जाहीर करण्यात आल्या. निवडणूक आयोगाची आज (दि.१६ मार्च) पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये आजपासून आचार संहिता लागू करण्याची घोषणा करण्यात आली. तसेच निवडणुकांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या. लोकसभेच्या निवडणुका 7 टप्यात होणार आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. ४ जूनला निकाल लागेल.  महाराष्टासाठी पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे.

 देशभरात 97.8 कोटी मतदार
या निवडणुकांसाठी देशात 97.8 कोटी मतदार आहेत. यात 49.7 कोटी पुरूष तर 47.1 कोटी महिला मतदार असून यंदा 1.82 कोटी नवीन मतदार मतदान करतील अशी माहिती यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

 गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदराबाबत महत्वपूर्ण निर्णय
ज्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्याबाबत माहिती मतदारांना पाहता येणार आहे. तसेच त्या उमेदवाराला याबाबत वृत्त पत्रातून माहिती द्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित पार्टीला गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उमेदवार का उभा केला? तेथे दुसरा पर्याय नव्हता का? याची उत्तरे द्यावी लागणार आहेत.

चार राज्यात होणार विधानसभेच्या निवडणुका  
आंध्र प्रदेश – 13 मे 2024, अरूणाचल प्रदेश – 19 एप्रिल 2024, सिक्कीम – 19 एप्रिल 2024

मतदानाबाबतची कोणतीही माहिती वेबसाईटवर मिळेल  
मतदानाबाबतची कोणतीही माहिती हवी असल्यास ती वेबसाईटवर मिळेल. उमेदवाराची प्रत्येक माहिती वेबसाईटवर मिळणार आहे. गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप असलेल्या उमेदवारांना त्याची माहिती वृत्तपत्रातून द्यावी लागणार आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या साईटवरही गुन्हेगारांची माहिती राहणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

असे असतील निवडणुकांचे टप्पे
19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान
26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान
7 मे रोजी होणार तिसऱ्या टप्प्यातील मतदान
13 मे रोजी होणार चौथ्या टप्प्यातील मतदान
20 मे रोजी होणार पाचव्या टप्प्यातील मतदान
25 मे ला होणार सहाव्या टप्प्यातील मतदान
१ जूनला होणार सातव्या टप्प्यातील मतदान

राज्यात ५ टप्प्यात निवडणुका!
लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 26 एप्रिलला पहिला तर 25 मे रोजी शेवटचा टप्पा असेल. 26 एप्रिलपासून, 7 मे, १३ मे, २० मे, २५ मे रोजी मतदान असेल तर ४ जूनला मतमोजणी होईल, अशी माहिती केंद्रीय निवडणुक आयुक्तांनी दिली आहे. तसेच तसेच 26 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. राज्यामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होईल. तसेच दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला, तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी, चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे, पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे, सहाव्या टप्प्यातील मतदान २५ मे रोजी आणि सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे.

असे असेल मतदान..
पहिला टप्पा, ता. १९ एप्रिल: रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर,
दुसरा टप्पा, ता. २६ एप्रिल: बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणीला मतदान होईल.
तिसरा टप्पा, ता. ७ मे: रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगलेला मतदान होईल.
चौथा टप्पा, ता. १३ मे: नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा, ता.२० मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

खबरदार! दारु, साड्या, पैसे वाटताना दिसला तर.. ; निवडणूक आयुक्तांचा गर्भित इशारा
लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच देशातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत देशभरातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तसेच निवडणुक काळात होणारे गैरप्रकार करताना आढळल्यास, मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रलोभणे दाखवल्यास कडक कारवाई होईल, असा इशारा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिला आहे.
आगामी निवडणूक काळात हिंसा टाळण्याचा निर्धार आम्ही केला आहे. आमच्यासमोर मसल पॉवर, मनी पॉवर, अफवा रोखण्याचे मोठे आव्हान होते. त्यासाठी आम्ही योग्य ती तयारी केली आहे. त्याप्रमाणे केंद्रीय पोलीस दलाच्या तुकड्या तैनात केल्या जातील. जिल्हास्तरावर एक कंट्रोल रूम असतील. चेक पोस्ट आंतरराष्ट्रीय सीमा, आंतरराज्य सीमेवर आहेत, ड्रोन मार्फत निरीक्षण केले जाईल,” असे राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी सांगितले आहे.
“राजकीय पक्षांसाठी आम्ही सूचना तयार केल्या आहेत. लहान मुलांना प्रचार करायला लावण्याला सक्त बंदी आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणी फुकट वस्तू वाटत असेल तर कारवाई होईल. कुठे पैसा, दारु, कुकर वाटप सुरू असेल, कुठे गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून C विजील ॲपवर टाका, तुमच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक करून १० मिनिटात आमची टीम तिथे पोहोचेल,” असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले आहे.
तसेच “प्रचार काळात टीका- टिप्पणी करु शकता. मात्र कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याबद्दल, धार्मिक तेढ होईल असे वक्तव्य, द्वेष वाद किंवा भावना दुखावणारे वक्तव्य केल्यास, आचारसंहितेचा भंग केल्यास कडक कारवाई होईल. अशी विधाने टाळावीत,” असेही निवडणूक आयुक्तांनी सांगितले आहे

एकूण मतदार किती?
निवडणूक आयोग या लोकसभा निवडणुकीसाठी योग्य टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहे. मनुष्यबळासाठी देखी आम्ही परिपूर्ण आहोत. लोकसभा निवडणुकीत 97 कोटी लोक मतदान करणार आहेत. यामध्ये 82 लाख मतदार हे 85 पेक्षा जास्त वयाचे आहेत. तर 48 हजार तृतीयपंथीय मतदान करणार आहेत.

फर्स्ट टाइम व्होटर किती?
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 1.8 कोटी तरुण फर्स्ट टाइम व्होटर असणार आहेत. देशातील 18 ते 19 या वयातील तब्बल 1.8 कोटी तरुण पहिल्यांदाच आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.

महिलांचा मतदानाचा वाटा वाढला
महिला मतदारांची संख्या वाढत आहे. 12 राज्यात पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त आहेत. 85 पेक्षा जास्त वयाच्या मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेतल जाणार आहे. एकाचवेळी देशात हा प्रयोग आम्ही पहिल्यांदा करत आहोत, असं मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...