पारनेर येथे प्रथम पुण्यस्मरण
पारनेर । नगर सहयाद्री:-
ज्येष्ठ नेते तुकाराम मते हे सामाजिक राजकीय जीवनामध्ये सक्रिय असताना त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी काम केले. अतिशय सत्यवादी विचारसरणी असलेले हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने समाज हितासाठी जीवन जगले. राजकारण करत असताना स्वार्थ न ठेवता आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी नेहमी साथ दिली. त्यांचाच वारसा त्यांची चिरंजीव संजय मते व विलास मते हे पुढे चालवत आहेत. स्व. तुकाराम मते यांनी संस्कारक्षम पिढी घडवली असे मत कीर्तनातून ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी व्यक्त केले. किर्तन सेवेतून मार्गदर्शन करताना त्यांनी उपस्थितांना धार्मिक सामाजिक विषयावर मार्गदर्शन केले.
पारनेर येथे ज्येष्ठ नेते स्व. तुकाराम मते यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तुकाराम मते हे पारनेर तालुक्याच्या राजकारणात समाजकारणात अनेक वर्ष सक्रिय होते त्यांनी पंचायत समिती सदस्य व खरेदी विक्री संघाचे चेअरमन असे अनेक विविध सामाजिक राजकीय पदे त्यांनी सांभाळली त्या कार्यकाळात त्यांनी अनेक समाज उपयोगी कामे केली. यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमा निमित्ताने यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, ज्येष्ठ नेते काशिनाथ दाते सर, भाजप तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे, माजी सभापती दीपक पवार, उद्योजक अर्जुन भालेकर, नगरसेवक पै. युवराज पठारे, सरपंच मनोज मुंगसे, नगरसेवक अशोक चेडे, बाजार समितीचे संचालक शंकर नगरे, खरेदी विक्री संघाच्या संचालिका रेखाताई मते, सुनील पवार, डॉ. बाळासाहेब कावरे, सभापती योगेश मते, दत्ता नाना पवार, ज्येष्ठ नेते मारुती रेपाळे, सरपंच लहू भालेकर दादाभाऊ वारे किरण कोकाटे, सरपंच पंकज कारखिले, मा. सरपंच जयसिंग मापारी, मा. सरपंच बाळासाहेब रेपाळे, शिक्षक नेते रा. या. औटी, दीपक नाईक, नगरसेवक ऋषिकेश गंधाडे, रवींद्र पडळकर, डॉ. संदीप औटी, उद्योजक संभाजी मगर, अजिंक्यतारा दरेकर, शाहीर मामा गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार मार्तंड बुचुडे सर, पारनेर खरेदी विक्री संघाचे सचिव राजेंद्र म्हस्के, दत्तात्रेय आवारी, राजू शेख, चंद्रकांत कुलकर्णी, आदी. उपस्थित होते तसेच यावेळी मते परिवारातील नातेवाईक हितचिंतक व स्व. तुकाराम मते यांचे जुने सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.