spot_img
राजकारणRSS व भाजपच्या गोटात गुप्त हालचाली ! भाजप आगामी निवडणुका एकटाच लढणार?...

RSS व भाजपच्या गोटात गुप्त हालचाली ! भाजप आगामी निवडणुका एकटाच लढणार? धक्कादायक दावा

spot_img

नागपूर / नगरसह्याद्री : आगमी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंघाने सध्या सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. जो तो आपल्यापद्धतीने कंबर कसत आहे. दरम्यान आता एक महत्वाची बातमी आली आहे.

हिवाळी अधिवेशनात शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनी रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती. आता याच पार्श्वभूमीवर आगमी लोकसभा निवडणुकीत भाजप कोणालाही सोबत न घेता स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचा धक्कादायक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे आव्हाडांचा दावा पाहता संघ आणि भाजपच्या गोटात प्रत्यक्षात वेगळयाच हालचाली सुरु असल्याचे संकेत मिळत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर केली असून आव्हाड यांनी म्हटले आहे की, नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये भाजप-आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले.

या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले. ज्यांच्यावर आरोप आहेत; ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आले. ज्यांना राजकारण समजते; ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

शिंदे गटाचे खासदार कमळ चिन्हावर लढणार?
शिंदे गटाच्या काही खासदारांनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे आगामी लोकसभा निवडणुकीत कमळाच्या चिन्हावर लढण्याबाबत प्रस्ताव मांडला होता. तीन राज्यातील भाजपची चलती पाहता महाराष्ट्रातही भाजपची चलती राहील असे म्हटले जात आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या काही खासदारांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हापेक्षा भाजपचे कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणारा गोल्डन गेटचा पर्दाफाश!, वाचा नगर क्राईम

​अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या रकमेवर अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी...

शिवसेनेच्या शुभांगी पोटे यांचा सार्‍यांनीच घेतला धसका; काय काय घडलं पहा

आप्पा चव्हाण | नगर सह्याद्री जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यात शिवसेना...

कानठळ्या बसविणारे सायलेन्सर पोलिसांनी चालविला रोडरोलर, नेमकं काय केले पहा

पोलिसांनी १३० मॉडिफाइड सायलेन्सरवर चालविला रोडरोलर अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प...

लोणीतील सराफ दुकानात जबरी चोरी; कुख्यात गुंडाची टोळी 12 तासांत जेरबंद

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- लोणी येथील अजय ज्वेलर्स दुकानात झालेल्या जबरी चोरीचा गुन्हा केवळ...