spot_img
आर्थिकSBI : स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ! वाचा सविस्तर

SBI : स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ! वाचा सविस्तर

spot_img

नगर सह्याद्री टीम : स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआय ही सर्वात मोठी बँक आहे. या बँकेचे करोडो ग्राहक आहेत. ही बँक ग्राहकांना विविध प्रकारच्या सुविधा पुरवत असते. या बँकेचे आपले एक योनो अॅप देखील आहे. याद्वारे लोकांना अनेक सुविधा देखील पुरवल्या जातात.

मात्र, आता योनो अॅपबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. याचा परिणाम सर्वांवर होऊ शकतो. तुम्हीही एसबीआयचे ग्राहक असाल तर ही बातमी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लवकरच सिंगापूर आणि अमेरिकेत आपले अस्तित्व प्रस्थापित करू इच्छित आहे. यासाठी SBI कडून ‘YONO Global’ हे बँकिंग मोबाईल अॅप लॉन्च केले जाणार आहे,

जे आपल्या ग्राहकांना डिजिटल रेमिटन्स आणि इतर सेवा प्रदान करेल. योनो ग्लोबलच्या माध्यमातून SBI सिंगापूर आणि अमेरिकेत आपला व्यवसाय वाढवणार आहे. SBI द्वारे अनेक देशांमध्ये YONO ग्लोबल सेवा आधीच पुरवल्या जात आहेत.

योनो ग्लोबल
सिंगापूर फिनटेक फेस्टिव्हल (SFF) च्या निमित्ताने डेप्युटी एमडी (IT) विद्या कृष्णन म्हणाल्या, “उपलब्ध सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आम्ही योनो ग्लोबलमध्ये गुंतवणूक करत आहोत. आम्हाला आमच्या ग्राहकांना अधिक चांगला अनुभव द्यायचा आहे.” तीन दिवसीय सिंगापूर फिनटेक फेस्टिव्हल (SFF) 17 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. कृष्णन यांनी सिंगापूरस्थित डिजिटल प्लॅटफॉर्म समर्थक तसेच स्थानिक नियामक आणि सेंट्रल बँक, मॉनेटरी अथॉरिटी ऑफ सिंगापूर (एमएएस) यांच्याशीही संवाद साधला.

अनेक देशांमध्ये सेवा
ते म्हणाले, “सिंगापूरमधील मोठ्या संख्येने भारतीय प्रवासी लक्षात घेता, आम्ही भारत आणि सिंगापूर दरम्यान पैसे पाठवण्यावर सातत्याने काम करत आहोत,” एसबीआय सध्या नऊ देशांमध्ये ‘योनो ग्लोबल’ सेवा देते. सप्टेंबर 2019 मध्ये ब्रिटनमधून याची सुरुवात झाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...

आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; ‘महापालिका निवडणुकीसाठी आघाडी’; किरण काळे यांनी दिली मोठी माहिती..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम...

चुलत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतण्यावर धारदार शस्त्राने सपासप हल्ला, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- माझ्या शेतातील लाकडे का आणली? असा जाब विचारत एका तरुणाला...

शिवसेनेला भाजपचा झटका; ‘बड्या’ नेत्याचा भाजपत प्रवेश!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अहिल्यानगर शहरातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली...