spot_img
ब्रेकिंगसंजय राऊतांचा गौप्यस्फोट ;...म्हणाले मोदी देशाला फसवत आहेत

संजय राऊतांचा गौप्यस्फोट ;…म्हणाले मोदी देशाला फसवत आहेत

spot_img

मुंबई । नगर सह्याद्री
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात एक प्रकारे मार्शल लॉ सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मोदी यांच्या पायाखालची बहुमताची सतरंजी मतदारांनी ओढून घेतली तरी मोदी सुधारायला तयार नाहीत. मोदी यांना सुधारण्याची, स्वतःला दुरुस्त करण्याची संधी होती, पण ते अवघडच दिसत आहे”, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊतांनी ‘सामना’ अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

“मोदी हे भाषणात खोटेपणाचे पतंग उडवतात. त्यांच्या उडवाउडवीचा जनतेला वीट आला आहे. मोदी यांच्या पायाखालची बहुमताची सतरंजी मतदारांनी ओढून घेतली तरी मोदी सुधारायला तयार नाहीत. मोदी यांना पन्नास वर्षांपूर्वीच्या आणीबाणीने अकारण त्रस्त केले आहे. खरे तर मोदी यांना त्रस्त व्हायचे कारण नाही. कारण आणीबाणीपेक्षा भयंकर स्थिती त्यांच्या राज्यात सुरू आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

“श्रीमती गांधी यांनी घोषित आणीबाणीच लावली. मोदी यांच्या राज्यात तर एक प्रकारे ‘मार्शल लॉ’सारखीच स्थिती निर्माण झाली आहे. मोदी यांना सुधारण्याची, स्वतःला दुरुस्त करण्याची संधी होती, पण ते अवघडच दिसत आहे. नरेंद्र मोदी यांच्यात बदल होईल काय? (म्हणजे ते आता तरी सुधारतील काय? असा प्रश्न अनेकांना अनेकदा पडत असेल. पंतप्रधानपदावर तीन वेळा बसलेल्या व्यक्तीने निदान देशाला भ्रमित करण्याची, खोटे बोलण्याची सवय तरी सोडून दिली पाहिजे, पण तिसऱ्यांदा शपथ घेऊनही मोदी बदलायला तयार नाहीत. त्यांचे फेकणे सुरूच आहे”, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...