spot_img
अहमदनगर‘दिल्लीत आप नगरमध्ये संग्राम जगताप’; केंद्रीय मंत्री आठवलेे नेमकं काय म्हणाले? वाचा..

‘दिल्लीत आप नगरमध्ये संग्राम जगताप’; केंद्रीय मंत्री आठवलेे नेमकं काय म्हणाले? वाचा..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
दिल्लीमध्ये आहे आप नगरमध्ये आहे आमदार संग्राम जगताप! व वक्त आयेगा तो मै दे दूंगा मेरी जान लेकिन किसीको बदलने नहीं दूंगा मेरे बाबासाहेब का संविधान!, नरेंद्र मोदी बढा रहे हैं देश कि शान नहीं बदल सकता भारत का संविधान अशा शेरो शायर आणि खुमासदार भाषणाने केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांनी नगर येथील सहकार सभागृह येथे आयोजित संविधान सन्मान मेळाव्यास संबोधित केले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हूणन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर उपस्थित होते. यावेळी पीआरपी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, आरपीआय चे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, जेष्ठ नेते अशोक गायकवाड, विजय वाघचौरे, सुवेंद्र थोरात, राजाभाऊ कापसे, सुनील साळवे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, प्रा.माणिक विधाते आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ना. आठवले म्हणाले प्रा. कवाडे सर व मी आम्ही दोन नेते संविधानाला मजबूत करणारे नेते आहोत. मी १९९० ला मंत्री झालो त्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यावेळेला मी कवाडे सरांना म्हणालो होतो. माझ्यासोबत चला पण सर त्यावेळेस आले नाही. मग मी शरद पवार यांना पाठिंबा दिला व मंत्री झालो. आता माझा एकही खासदार नसतांना मला तिसर्‍यांदा केंद्रीय मंत्री पदाची संधी नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

आमच्या पक्षामुळे नरेंद्र मोदी देखील तिसर्‍यांदा पंतप्रधान झाले आहेत. यावेळी त्यांनी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विकास कामाचे कौतुक केले. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी संविधान सन्मान मेळाव्याचे कौतुक केले. आमदार संग्राम जगताप यांचे विकास कामे जोरात चालू असून लवकरच अहमदनगर शहरात डॉटर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असून ही प्रतिमा सर्वोच्च न्यायालयातील बसवलेला बाबासाहेबांचा पुतळा हाच शहरात उभारण्यात येणार असल्याने कौतुकास्पद बाब असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप म्हणाले की, हा मेळावा संविधानाचा गौरव करण्यासाठी संविधान सन्मान मेळावा आयोजित केला आहे. रामदास आठवले हे तिसर्‍यांदा केंद्रीय मंत्री झाल्याबद्दल व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. आ. जगताप, आ. शिवाजीराव गर्जे सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी केले. यावेळी निमंत्रक सुमेध गायकवाड, अजय साळवे, जेष्ठ नेते विजय भांबळ, प्रा. विलास साठे, प्रा. जाधव सर, संभाजी भिंगारदिवे, विजय जगताप, प्रकाश साळवे, प्रा. जयंत गायकवाड, महेश भोसले, किरण दाभाडे, आदीसह फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीगोंद्यात गुन्हेगारीचा कहर! महिलेच्या डोक्याला लावली पिस्तुल, पुढे घडलं असं काही..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुक्यातील वडाची वाडी येथे कोर्टातील दाव्याच्या कारणावरून एका महिलेस पिस्तुलाचा...

नगरमध्ये चाललंय काय? दोन दिवसात ‘इतक्या’ अल्पवयीन मुला-मुलीचे अपहरण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दोन दिवसांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अल्पवयीन मुलीसह मुलाचे अपहरण केल्याच्या...

गोदावरीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, पहा कुठे काय परस्थिती?

नाशिक । नगर सहयाद्री :- नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अवसायानात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांची प्रतिक्षा अखेर संपली असून...